Threat Call: “मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार…”; पोलिसांना ट्विटरवर पुन्हा धमकी

Threat Call: “मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार…”; पोलिसांना ट्विटरवर पुन्हा धमकी

Mumbai Blast Threat Call: मी मुंबईत (Mumbai) बॉम्बस्फोट करणार आहे. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. पण यंदा फोन किंवा ईमेलवरुन (E-Mail) नाहीतर थेट ट्विटरवरुन (Twitter) धमकी मिळाली आहे. पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी तपास सुरू केला आहे. तसेच, अधिक चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पुन्हा एकदा दहशत माजवण्याची धमकी मुंबई पोलिसांना मिळाली आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसांना फोन आणि ई-मेलच्या माध्यमातून धमक्या मिळत होत्या, पण आता एका व्यक्तीने ट्विटरच्या माध्यमातून मुंबईला उडवण्याची धमकी दिली आहे.

The Kerala Story ची कोटी-कोटी उड्डाणे : बॉक्स ऑफिसवर रचला नवा इतिहास

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (22 मे) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर “मी लवकरच मुंबईत स्फोट घडवणार आहे” असा मेसेज पाठवला आहे. हा मेसेज इंग्रजी भाषेत पाठवण्यात आला होता. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीनं मेसेजमध्ये लिहिलं आहे की, “I M Gonna Blast The Mumbai Very Soon.” हा मेसेज गांभीर्यानं घेत मुंबई पोलिसांनी संबंधित खात्याची चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube