मुंबई : मी भाजपला सोडलं, हिंदुत्व नाही, मला काँग्रेससोबत जाण्यासाठी भाजपनेच प्रवृत्त केल्याचा घणाघात उध्दव ठाकरे यांनी केला आहे. ते उत्तर भारतीयांच्या मेळाव्यातून बोलत होते. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर पहिल्यांदाच उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन केंद्र सरकारसर राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
ठाकरे बोलताना म्हणाले, सध्या हिंदुत्ववादावरुन लोकांना मुर्ख बनवलं जात असून जे आमच्यासोबत झालंय ते इतर पक्षासोबतही होऊ शकतं, आता आमची मशालही काढून घेतील. विरोधकांकडून खालच्या पातळीवर राजकारण सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
राज्य सरकारच्या पाठिशी दिल्लीतील महाशक्ती; मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी स्पष्टच सांगितले..
तसेच आता मुंबईला दासी बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे, निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे लोकांमध्ये संतापाची लाट पसरली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई पालिकेच्या ठेवीमध्ये कर्मचाऱ्यांचा पैसा आहे, मुंबईतील कोस्टल रोड महापालिकेच्या फेडीमधून बांधला जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
Amit Shah यांनी घेतली गिरीश बापट यांची भेट
त्याचप्रमाणे आम्हाला बाळासाहेबांनी गुलामगिरी करायला सांगितली नाही. काँग्रेसच्या काळात ईस्लाम अडचणीत असल्याचा नारा आता हिंदु अडचणीत असल्याचा नारा दिला जात असल्याचंही ते म्हणाले आहेत. सध्या सर्व गोष्टी मुंबई महाराष्ट्राबाहेर जात आहेत, मतांसाठी पंतप्रधान मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालावा लागत, असल्याचंही ते म्हणाले आहेत.
Pune By Election: मी मरणार, बावनकुळे यांच्या वक्तव्याचा अजित पवारांकडून समाचार
आज सर्व गोष्टी बुद्धीबळाच्या खेळासारख्या सुरु आहेत. माझ्या वडिलांनी ज्यांना मोठं केलं, आता त्यांना मालक व्हायचंय, राज्याचा पैसा केंद्राच्या खिशात का ठेवता आहात? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
पुणे-अहमदनगरसह देशातील ५७ कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान
दरम्यान, आज माझ्या हातात काहीच नाही. चोरलेलं धनुष्यबाण घेऊन मैदानात या, असं आव्हान उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपच्या नेत्यांना दिला आहे. तसेच साथ आना हो तो साथ निभाना पडेगा, अशी साद ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना घातली आहे.