अहिल्यानगरमध्ये वनविभागाची मोठी कारवाई, ‘त्या’ नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात अखेर यश

Ahilyanagar Leopard Attack : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढत असल्याने बिबट्याला ठार मारण्यात यावे

Ahilyanagar Leopard Attack

Ahilyanagar Leopard Attack

Ahilyanagar Leopard Attack : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढत असल्याने बिबट्याला ठार मारण्यात यावे अशी मागणी वनविभागाकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेसह 4 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. यानंतर कोपरगावातील बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वनविभागाकडून देण्यात आले होते.

कोपरगाव (Kopargaon) तालुक्यातील टाकळी शिवारात 4 वर्षीय मुलीचा बिबट्याचा हल्ल्यात (Ahilyanagar Leopard Attack) मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त नागरिकांनी मृतदेहासह नगर- मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली होती. तर आता वनविभागाने मोठी कारवाई करत बिबट्याला ठार मारले आहे.

माहितीनुसार, शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास धारणगाव शिवारात वन विभागाने मोठी कारवाई करत बिबट्याला ठार मारले. कोपरगाव तालूक्यात एकात आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलगी आणि एका 60  वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरु होता.

BCCI ची मोठी घोषणा, मिनी लिलावाची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी 10 संघ खर्च करणार तब्बल 237.55 कोटी

परिसरातील नागरिक आणि वनविभागाच्या अधिकारी तसेच वनकर्मचारी यांच्या मदतीने गेल्या सहा दिवसांपासून बिबट्याचा शोध सुरु होता. तर आता वनविभागाने मोठी कारवाई करत बिबट्याला ठार मारले आहे.

November 16 Horoscope : मेष ते मीन आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी स्थिती

Exit mobile version