Download App

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे आणि देणारे अधिकारी आले गोत्यात ? बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

Mla Bachchu Kadu letter to Cm Eknath Shinde: राज्यातील दिव्यांगांना न्याय देण्यासाठी दिव्यांग पडताळणी समिती तातडीने स्थापन करण्यात यावी.

  • Written By: Last Updated:

Mla Bachchu Kadu letter to Cm Eknath Shinde: दिव्यांग प्रमाणपत्र देऊन पूजा खेडकर ही आयएएस अधिकारी झाली होती. तिने पुणे, नगर दोन्ही ठिकाणहून दिव्यांग प्रमाणपत्र मिळविले होते. त्यात अनेक गौडबंगाल आहेत. पूजा खेडकर (Pooja Khedkar) हिचे अधिकारीपद गेले असून, तिच्यावर गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. तर राज्यातील बनावट प्रमाणपत्र प्रकरणात आता दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष व आमदार> बच्चू कडू ( Mla Bachchu Kadu) हेही आक्रमक झाले आहेत. दिव्यांग प्रवर्गातून शासकीय, निमशासकीय नोकरी मिळविलेल्या उमेदवारांची फेर वैद्यकीय तपासणी करावे, तसेच खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रधारक उमेदवार बोगस प्रमाणपत्र देणारे सरकारी यंत्रणेतील जबाबदार अधिकारी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मोठी मागणी बच्चू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून करण्यात आली आहे. (form a Disability Verification Committee immediately Mla Bachchu Kadu letter to Cm Eknath Shinde)

राज्यात मोठ्या प्रमाणात दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र देऊन बरेच उमेदवारी सरकारी व निमसरकारी सेवेत दाखल झालेत. अलिकडे पूजा खेडकर यांनी यूपीएससीची फसवणूक करून आयएएस पद मिळविले होते. याची यूपीएससीने दखल घेऊन खेडकरवर कारवाई केली आहे. दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्रामुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होत आहे. याकरिता जात पडताळणी समितीच्या धर्तोवर दिव्यांग पडताळणी समिती स्थापन करणे आवश्यक आहे. या आरोग विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग व संबंधित प्रशासनास बैठका घेऊन सूचना देखील केल्या होत्या. परंतु यावर अद्याप कार्यवाही केलेली नाही. तरी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवारी होणे आवश्यक असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी पत्रात म्हटले आहे.


काठावरील बहुमताचा मोदी सरकारला फटका : वक्फ बोर्डाचे विधेयक लोकसभेत लटकले

दिव्यांगांना न्याय देण्यासाठी 19 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान राबविण्यात आले होते. या अभियानातून शासकीय व निमशाकीय सेवेत दाखल झालेल्या उमेदवारांची नावे निदर्शनात आलेली आहेत. सदर संशयित उमेदवारांची दिव्यांगत्व तपासणी करून त्यातील सत्यता पडताळणी आवश्यक आहे. यादीतील उमेदवारांचे दिव्यांगत्व व दिव्यांग प्रमाणपत्र पुर्नतपासणी करून त्याची पडताळणी करण्यात आली. तसेच बोगस दिव्यांग सापडल्यास त्यांच्यावर कार्यवाही करून बर्डतर्फ करण्यात यावे. तसेच त्यांच्या जागेवर प्रतित्रा यादीतील दिव्यांग उमेदवार यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच बोगस प्रमाणपत्र वितरीत करणाऱ्या शासकीय यंत्रणेतील संबंधितांवर कारवाई करून गुन्हा दाखल करावा. तसेच मागील पंधरा वर्षात सरकारी, निमसरकारी सेवेत असलेल्या दिव्यांगांची फेर वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, त्यात बोगस दिव्यांग आढळून आल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावे, अशी मागणी करण्यात यावी.

विनेश फोगटला रौप्य पदक मिळण्याची शक्यता, लवादा कोर्टात केलं अपील

दिव्यांग पडताळणी समिती तातडीने स्थापन करा
राज्यातील दिव्यांगांना न्याय देण्यासाठी आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, संबंधित प्रशासकीय विभागास सूचना देऊन दिव्यांग पडताळणी समिती तातडीने स्थापन करण्यात यावी. त्यांची पंधरा दिवसाच्या आत फेर मेडिकल व दिव्यांग प्रमाणपत्र करण्यात आली. या करिता आदेश द्यावा, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. बनावट दिव्यांग घेणाऱ्यांची काही संशयिताची नावेही बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहेत.

follow us