Download App

ललित पाटील प्रकरणात माजी महापौर विनायक पांडेची होणार चौकशी, गुन्हे शाखेने पाठवली नोटीस

  • Written By: Last Updated:

Vinayak Pandey : ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्ज रॅकेट प्रकरणात एकामागून एक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आता या प्रकरणात नाशिकच्या माजी महापौरांचे नाव समोर आलं. नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून दादा भुसे यांचे नाव घेतले जात असतानाच ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे (Vinayak Pandey) अडचणीत आले आहेत. त्यांना पोलीस आयुक्तांनी (Nashik Commissioner of Police) चौकशीसाठी नोटीस पाठवली असून नाशिक गुन्हे शाखेकडून आज त्यांची चौकशी होणार आहे.

‘सरकारने विश्वास दिला होता, जरांगेंचा दोष नाही’; शरद पवारांनी उपोषणावर मौन सोडलं 

ललित पाटीलची अपघातग्रस्त कार दुरूस्ती करण्यासाठी महापौर विनायक पांडे याच्या चालकाने त्याला मदत केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. यामुळं या प्रकरणात पांडे यांची चौकशी होणार आहे. ललित पाटील बेवारस कार फ्रकरणी विनायक पांडे यांना पोलिसांकडून चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली. आज पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांनी चौकशीसाठी बोलावले असून पांडे आयुक्ता कार्यालयाकडे रवाना झाले आहे.

दरम्यान, काल पांडे यांनी पत्रकार परिषद घेत आपला ललित पाटीलशी २०१६ नंतर कोणताही संपर्क नाही. ललितची गाडी चालवणार चालक माझ्याकडे कामाला होता. दीड वर्षापूर्वीत च्याला कामावरून काढून टाकले. आता या प्रकणात आपलं नाव आल्यां आपण चौकशीला तयार असल्याचं पांडे यांनी म्हटलं. आपल्याला राजकीय जीवनातून उठवण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचं नाव आल्यामुळं शिंदे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत भुसे यांनी घेरण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे. मात्र, आता ठाकरे गटाचा नेत्याचीच या प्रकऱणात चौकशी होत असल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, पांडे यांच्या चौकशीतून काय समोर येतं हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us