‘सरकारने विश्वास दिला होता, जरांगेंचा दोष नाही’; शरद पवारांनी उपोषणावर मौन सोडलं

‘सरकारने विश्वास दिला होता, जरांगेंचा दोष नाही’; शरद पवारांनी उपोषणावर मौन सोडलं

Sharad Pawar Speak On Maratha Reservation : मनोज जरांगे(Manoj Jarange) यांना सरकारने विश्वास दिला होता, त्यामुळे आता मनोज जरांगे यांना दोष देता येणार नसल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी मौन सोडलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी याआधी आमरण उपोषण केलं, तेव्हा शरद पवारांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला होता. आता पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

Maratha Reservation : कुणबी दाखले प्रमाणपत्र समितीला सरकारने मुदवाढ का दिली? खरं कारण आलं समोर…

शरद पवार म्हणाले, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी काही मागण्या केल्या आहे. याआधी जरांगेंनी उपोषण केलं तेव्हा मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जरांगेंशी सुसंवाद केला होता. मात्र, त्यांचं प्रत्यक्षात बोलणं झालं की नाही हे मला माहित नाही. सरकारला 30 दिवसांची मुदत होईल, असा विश्वास सरकारने त्यांना दिला होता. मात्र, मागण्या पूर्ण न झाल्याने मनोज जरांगे यांना दोष देता येत नसल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

‘हायप्रोफाईल’ खटले लढणारे मानेशिंदे मराठा आंदोलकांसाठी मैदानात; घेणार मोफत वकिलपत्र

मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुदत आता संपली आहे. मुदत संपूनही सरकारने अद्याप मराठा आरक्षणासंदर्भात ठोस पाऊले उचलल्याचं दिसत नसल्याने मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी उपोषणादरम्यान राज्यातील जवळपास सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं होतं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, मनसे, या पक्षांनी जरांगेंना समर्थन दिल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता शरद पवारांनी सरकारवरच ताशेरे ओढले आहेत. जे करणं शक्य नसेल त्याचं आश्वासन सरकारने देऊ नये, असा टोला पवार यांनी लगावला आहे.

Apoorva Movie Trailer: तारा सुतारियाचा ‘अपूर्वा’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काल अहमदनगर दौऱ्यावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिर्डीत सभा पार पडली. या सभेत मोदींनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एकही शब्द उच्चारला नसल्याने राज्यभरातील मराठा समाजबांधवांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यावरुन मनोज जरांगे यांनी मोदींना गोरगरीबांची आवश्यकता नसल्याची टीका केली.

Maratha Reservation : ‘आमची शांतताच सरकारला जेरीस आणणार’; जरांगे पाटलांची पुन्हा डरकाळी

बबनराव ढाकणेंनी जनतेसाठी संघर्ष केला :
बबनराव ढाकणे यांनी जनता पक्षाचं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं होतं. ते माझ्याच मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यावेळी ढाकणे यांनी मंत्रिपदाची चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडली आहे. ढाकणे अत्यंत जिद्दी होते. त्यांनी दुष्काळी भागांची चांगली सेवा केली आहे. आज ते नाहीत त्याचं दुख: असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube