Maratha Reservation : ‘आमची शांतताच सरकारला जेरीस आणणार’; जरांगे पाटलांची पुन्हा डरकाळी

Maratha Reservation : ‘आमची शांतताच सरकारला जेरीस आणणार’; जरांगे पाटलांची पुन्हा डरकाळी

Maratha Reservation : आमची शांतताच सरकारला जेरीस आणणार असल्याचं म्हणत पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange Patil) डरकाळी फोडली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी याआधीही आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. सरकारच्यावतीने मंत्री गिरीश महाजनांनी विनवणी करुनही जरांगे यांनी पुन्हा उपोषणाची घोषणा केलीयं. अखेर आता मराठा माघार घेणार नसल्याचंही जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

Manoj Jarange यांनी पाणी तरी प्राशन करावं; संभाजीराजे पोहचले आंतरवाली सराटीत

जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार समित्या, आयोगाची स्थापना करीत आहे पण त्याची गरजच काय आहे? आता सरकारने विलंब करु नये. हिंसेचे समर्थन करणार नसून आमची शांतताच सरकारला जेरीस आणणार असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आता सरकारला एक तासांचा देखील जास्तीचा वेळ देणार नाही. पण, आता माघार घेणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या इशाऱ्यानंतर भाजप अलर्ट; महाजन म्हणाले, त्यांचं वक्तव्य…

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपला असून त्यामुळे मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण देण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याच पार्श्नभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत काल संपली.

पंकजांचा राजळे, प्रितम मुंडेंना दिलासा! मेळाव्यातून म्हणाल्या, कोणाचे हिसकावून खाणार नाही

जरांगे पाटील म्हणाले, आधी 17 दिवसांचे उपोषण केले, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य नेत्यांच्या विनंतीनंतर त्यांच्या शब्दानंतर आपण 40 दिवसांची मुदत दिली. पण या काळात त्यांनी आरक्षण दिले नाही.

ड्रग्स प्रकरण: मी एक आई म्हणून गृहमंत्र्यांकडे न्याय मागते, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

आम्ही त्यांच्या शब्दाचा मान ठेवला, मग आमचं काय चुकलं? आमच्या मुलांची आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांना आरक्षण आहे, पण आम्हालाच आरक्षणापासून डावललं जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

‘…तेव्हा मी पहिल्यांदा विधानसभेत गेलो’; अजितदादांसमोरच शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

दिल्लीवरुन निर्णयच घेऊन या…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत भाजपच्या हाय कमांड नेत्यांशी सविस्तरपणे चर्चा करणार आहेत. त्यामुळे आता शिंदे-फडणवीसांनी मराठा आरक्षण देण्याचा निर्णयच घेऊन राज्यात यावं, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube