ड्रग्स प्रकरण: मी एक आई म्हणून गृहमंत्र्यांकडे न्याय मागते, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

ड्रग्स प्रकरण: मी एक आई म्हणून गृहमंत्र्यांकडे न्याय मागते, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Supriya Sule : गेल्या काही दिवसांपासून ललीत पाटील (Lalit Patil) आणि ड्रग्स प्रकारणाने (Drug Case) राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात ड्रग्ज प्रकरणं सापडणं म्हणजे गृहमंत्रालयाचं पूर्णपणे अपयश आहे. ट्रिपल इंजिनचं खोके सरकार काय काम करतंय. चाललंय तरी काय, गृहमंत्री करतायत काय? असा सवाल त्यांनी केला आहे.

त्यापुढे म्हणाल्या की अनेक गोष्टींत गृहमंत्रालयाचं लक्षच नाही. सरकारचा डेटाच सांगतोय की राज्यात गुन्हेगारी वाढतीय. ड्रग्सबद्दल गृहमंत्र्यांचं काय मत आहे. एक आई, लोकप्रतिनिधी आणि एक नागरिक म्हणून मी गृहमंत्र्यांकडे न्याय मागते आहे. गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं. ड्रग्जबद्दल गृहमंत्र्याचं काय मत आहे?

Ajit Pawar : फडणवीसचं हुकमी एक्का; मंत्रिमंडळ विस्तारावर बोलतांना अजितदादांची कबुली

ट्रिपल इंजिन सरकार पक्ष फोडणे, ईडी, सीबीआय, आयकर विभाग, खोक्यांचा धंदा करणे एवढंच करतंय. हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे. बीड येथे झालेल्या घटनेवर गृहमंत्रालयाने उत्तर द्यावं, जे गृहमंत्री टीव्ही म्हणायचे की मी तोंड उघडलं की असं होईल तसं होईल म्हणायचे, आम्ही वाट पाहतोय. ड्रग्समध्ये काय नेक्सस आहे? बीडमधील घटनेवर सरकार काय करणार आहे? आरोग्याच्या समस्या, नांदेडमधील घटना, शाळा कमी होतायत आणि दारुची दुकाने वाढतात. छत्रपती आणि शाहू, फुलेंचा हा महाराष्ट्र आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा; दंड थोपटत अजितदादांची सरकारकडे मोठी मागणी

राज्यात अनेक घटक आरक्षण मागत आहेत. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज आरक्षण मागत आहेत. याविषयी सातत्याने बाहेर बोलण्यापेक्षा विशेष अधिवेशन बोलवावं. इस्रायल-पॅलेस्टाईनमधील वाद, रशियाचा वाद यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तातडीने संसदेचं अधिवेशन किंवा सर्वपक्षीय बैठक सरकारने बोलवली पाहिजे. तसंच महाराष्ट्रात आरोग्य, शिक्षण, आरक्षणाचे मुद्दे अशी गंभीर आव्हान राज्यासमोर आहेत. त्यामुळे मला वाटतं की राज्य प्रचंड अस्थिर आहे. त्यामुळे सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube