आणखी एक खरात! स्वतःला बाळूमामा भासवून फसवणूक करणाऱ्या भोंदूला बेड्या; राजकीय कनेक्शन समोर येणार?

Manohar Bhosale pretended to Balumama सोलापूरच्या करमाळ्यामध्ये. स्वतःला बाळूमामा भासून भक्तांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Manohar Bhosale Pretended To Balumama

Manohar Bhosale Pretended To Balumama

fraudster Manohar Bhosale pretended to Balumama and cheated is arrested : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकमधील भोंदू अशोक खरातचं प्रकरण काय बाहेर आलं. त्यानंतर सर्वच भोंदू बाबांचे प्रकरण समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे भोंदू बाबांची जणू काही आता रीघच लागली आहे. त्यामध्ये आता आणखी भर पडली आहे. ती म्हणजे सोलापूरच्या करमाळ्यामध्ये. स्वतःला बाळूमामा भासून भक्तांची फसवणूक करणाऱ्या मनोहर मामाची. याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

सोलापूरमधील करमाळा येथील उंदरंगाव येथे राहत असलेल्या मनोहर मामा भोसले असे या भोंदूचे नाव आहे. त्याने स्वतःची प्रतिमा बाळूमामा अशी केली आहे. लोक त्याला मनोहर मामा असेच म्हणतात. तो लोकांना त्यांच्या व्यवसायामध्ये, उद्योगांमध्ये भरभराट करायची असेल तर पूजाअर्चा केली पाहिजे असं सांगून फसवतो.अशाच एका प्रकरणामध्ये त्याने आणि त्याच्या सहकाऱ्याने एका भक्ताकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. यामध्ये संबंधित भक्ताने पन्नास हजार रुपये त्याला दिले देखील होते.

सत्ता अन् पैशांसाठी… कायदा हवाच; राघव चढ्ढांच्या भाजप प्रवेशावर आण्णा हजारे संतापले

मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित व्यक्तीने कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात मनोहर भोसले आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर त्या दोघांवर आर्थिक फसवणूक, जादूटोणा आणि अर्ध अंधश्रद्धा निर्मूलन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कुर्डूवाडी पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून तात्काळ मनोहर भोसलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या चौकशी दरम्यान अनेक गुन्ह्यांची चौकशी देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी किती मोठा आहे हे देखील लवकरच समोर येईल.

कैलाश सत्यार्थींना लता दीनानाथ पुरस्कार! मुख्य पुरस्काराबरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचाही गौरव

दरम्यान या मनोहर भोसलेचे अनेक ठिकाणी मठ आहेत. त्यांने आपली प्रतिमा बाळूमामा अशी तयार केली आहे. मात्र त्याची कारकीर्द वादग्रस्त आहे. त्याच्यावर सोलापूरसह पुणे आणि आणखी इतर ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मात्र तो आध्यात्मिक मठ चालवत होता. करमाळा आणि गाणगापूर या ठिकाणी त्याचे मठ आहेत. या ठिकाणी दररोज हजारो भाविक येतात.

अखेर राज्य सरकारी कर्मचारी अन् शिक्षकांचा संप मागे; मुख्य सचिवांसोबतच्या अश्वासनानंतर समन्वय समितीचा निर्णय

विशेष म्हणजे हा स्वतःला ज्योतिषाचार्य म्हणून घेणारा असून तो भक्तांना दुर्धर आजारातून बरा करण्याचा दावा करतो. याहूनही धक्कादायक म्हणजे सामान्य लोकांसह ह्या मनोहर भोसलेकडे आणि त्यांच्या साथीरांच्या मोबाईलमध्ये राज्यातील बडे नेते मंडळी अधिकाऱ्यांच्या सोबत फोटो सेव ठेवलेले असायचे. त्याच्या करमाळा तालुक्यातील उंदरंगाव या ठिकाणी दर अमावस्येला महागड्या गाड्यातून येणारे राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील मंडळी भेट द्यायचे. त्यामुळे खरा प्रमाणे याही प्रकरणात राजकीय कनेक्शन समोर येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Exit mobile version