FUEL honoured with the prestigious CSR Times 2026 Award for its innovative education initiatives : शिक्षणातील अभिनव प्रयोग आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (SCR) निधीचा परिणामकारक वापर करून संस्थात्मक उभारणी करणाऱ्या पुणे स्थित ‘फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्ह्ज’ (FUEL) संस्थेला 13 व्या राष्ट्रीय सीएसआर (SCR) व ईएसजी (ESG) परिषदेत प्रतिष्ठित ‘सीएसआर टाईम्स 2026’ (CSR Times 2026 Award) अवॉर्डने गौरविण्यात आले. हा पुरस्कार केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री श्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट का घेतली?, काय म्हणाले अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके?
समावेशक भारतासाठी जबाबदार उद्योगांची भूमिका” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या परिषदेला देशभरातून 500 हून अधिक प्रतिनिधी प्रत्यक्ष तर 2500 हून अधिक नागरिक ऑनलाईन उपस्थित होते. नवी दिल्लीतील ले मेरिडियन हॉटेलमध्ये पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात फ्यूलच्या ‘कॉर्पोरेट देणगी आणि नामांकित शाळा’ या अनोख्या शैक्षणिक प्रारूपाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. फ्यूलच्या वतीने डॉ. प्राची अहिराव (विभागप्रमुख व व्यवस्थापन विद्याशाखा) आणि श्रीमती सोनाली घोंगडे (वित्त अधिकारी) यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह खासदार प्रमोद बोरो, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, खासदार प्रविण पटेल, सीएसआर टाईम्सच्या ज्युरीचे अध्यक्ष डॉ. भास्कर चॅटर्जी आदी प्रमुख मान्यवर, धोरणकर्ते व उद्योग जगतातील नेते उपस्थित होते.
इराणसोबतच्या युद्धामुळे अमेरिकेपुढे मोठे संरक्षण संकट; आता डोनाल्ड ट्रम्पवर खासदार नाराज
‘फ्युएल’चा 19 वर्षांचा यशस्वी प्रवास
2007 मध्ये एक लहान करिअर मार्गदर्शन संस्था म्हणून सुरू झालेल्या ‘फ्यूल’चे आता ‘फ्यूल स्किलटेक अँड आंत्रप्रेन्युअरशिप विद्यापीठ’मध्ये रूपांतर झाले आहे. हे विद्यापीठ मुख्यतः सीएसआर निधीच्या माध्यमातून उभे राहत असून, हे भारतीय उच्च शिक्षण क्षेत्रातील अत्यंत दुर्मिळ व वेगळे उदाहरण ठरले आहे. ‘शिक्षणाचे देणगी आणि दत्तक प्रारूप’ या फ्यूलच्या प्रारूपांतर्गत कॉर्पोरेट कंपन्या व दानशूर व्यक्तींना विद्यापीठातील संपूर्ण शैक्षणिक शाळा दत्तक घेण्याचे आणि त्यांना स्वतःचे नाव देण्याचे आमंत्रण दिले जाते. यामुळे तुटपुंज्या स्वरूपात खर्च होणारा सीएसआर निधी कायमस्वरूपी शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये रूपांतरित होतो. यातून पहिल्या पिढीतील विद्यार्थी, शेतकरी व सैनिकांची मुले, महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना दशकानुदशके गुणवत्तेचे शिक्षण मिळणे शक्य होणार आहे.
‘फ्यूल’ची आजवरची ठळक कामगिरी
फ्यूलने गेल्या दोन दशकांत 90 हून अधिक कॉर्पोरेट भागीदारांच्या मदतीने 248 कोटींहून अधिक रुपयांचा सीएसआर निधी उभारला आहे. या माध्यमातून 12.52 लाखांपेक्षा जास्त युवकांपर्यंत पोहोचून 9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व 2.93 लाखांपेक्षा जास्त युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच गरजू कुटुंबांतील 2,907 हून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली आहे.
नवा दिवस, नवा विक्रम! ‘स्पायडर-मॅन’ भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट
सीएसआर निधी केवळ अल्पमुदतीच्या प्रकल्पांपुरता मर्यादित न राहता, त्यातून कायमस्वरूपी आणि शाश्वत संस्था उभारणी होऊ शकते, हे फ्यूलच्या या मॉडेलने सिद्ध केले आहे. या पुरस्कारामुळे आमच्या या मॉडेलला मोठे बळ मिळाले आहे. असे डॉ. केतन देशपांडे (संस्थापक व अध्यक्ष, फ्युएल) यांनी सांगितले.
