नवा दिवस, नवा विक्रम! ‘स्पायडर-मॅन’ भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट
Spider-Man भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ची दमदार घोडदौड सुरूच आहे.
New day, new record! ‘Spider-Man’ becomes the highest-grossing Hollywood film in India : भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ची दमदार घोडदौड सुरूच आहे. दुसऱ्या वीकेंडमध्येही चित्रपटाने जबरदस्त कमाई करत अवघ्या 11 दिवसांत भारतात 500 कोटी रुपयांच्या ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शनचा (GBOC) टप्पा पार केला आहे. भारतात 500 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा हा पहिला आणि एकमेव हॉलिवूड चित्रपट ठरल्याचा दावा करण्यात आला आहे.
CINTAA बरखास्त झाल्याचा दावा चुकीचा’; 68 वर्षांची संस्था अफवांमुळे कमजोर होऊ शकत नाही
प्रदर्शनापासूनच टॉम हॉलंडच्या ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ने भारतीय बॉक्स ऑफिसवरील कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत. दररोज नवे विक्रम प्रस्थापित करत या चित्रपटाने कमाईचे नवे मापदंड निर्माण केले आहेत. रविवारी चित्रपटाने तब्बल 42 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे भारतातील चित्रपटाची एकूण ग्रॉस कमाई अवघ्या 11 दिवसांत 504 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
‘अनहॅप्पी’ असाल तर ऑफिसला येऊ नका; अनोखी रजा पॉलिसी चर्चेत, हर्ष गोयंकाही मैदानात
भारतासोबतच उत्तर अमेरिकेतील बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. उत्तर अमेरिकेत दुसऱ्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ने तिसरे स्थान मिळवले आहे.जागतिक स्तरावरही चित्रपटाने मोठी कामगिरी केली असून, परदेशातील बॉक्स ऑफिसवर 1 अब्ज डॉलरची कमाई करणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वेगवान चित्रपट ठरला आहे. त्यामुळे ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’च्या विक्रमी यशात आणखी एका कामगिरीची भर पडली आहे.
दिवसनिहाय कमाई
दिवस ग्रॉस कमाई
पहिला दिवस, गुरुवार 73 कोटी रुपये
दुसरा दिवस, शुक्रवार 58.4 कोटी रुपये
तिसरा दिवस, शनिवार 85 कोटी रुपये
चौथा दिवस, रविवार 93 कोटी रुपये
पाचवा दिवस, सोमवार 28 कोटी रुपये
सहावा दिवस, मंगळवार 26.3 कोटी रुपये
सातवा दिवस, बुधवार 22 कोटी रुपये
आठवा दिवस, गुरुवार 18 कोटी रुपये
नववा दिवस, शुक्रवार 18.5 कोटी रुपये
दहावा दिवस, शनिवार 41 कोटी रुपये
अकरावा दिवस, रविवार 42 कोटी रुपये
आतापर्यंतची एकूण कमाई : 504 कोटी रुपये
‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ हा चित्रपट इंग्रजीसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. सर्व भाषांमधील आवृत्त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, भारतातील स्पायडर-मॅनच्या लोकप्रियतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.