Download App

कोरोना नमुन्यांचं जीनोम सीक्वेन्सिंग होणार, राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी आता कोरोना नमुन्यांच्या जीनोम सीक्वेन्सिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दोन वर्षांनंतर आता पुन्हा एकदा कोरोना विषाणुने डोकं वर काढलंय. जगभरात कोरोना विषाणुचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या आदेशानुसार आता नमुन्यांच्या जीनोम सीक्वेंसिंग करुन नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.

जगभरात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत केंद्र सरकारकडून जगभरातील देशांच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यांनंतर आता पुन्हा एकदा कोरोना विषाणुचा फैलाव थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

मागील काही दिवसांपासून जगभरात जवळपास 36 लाख कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर चीनमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्याची परिस्थिती दिसून येत आहे. चीनमध्ये गत दिवस अनेकांचा मृत्यु होत असून मृतदेहांचा खच पडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, जगभरात कोरोना विषाणुचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून औषधांसह खाटांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

यासंदर्भात माहिती देताना राज्य आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी संजय खंदारे म्हंटले की, राज्यातील कोरोना रुग्णांचे सर्व नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी मुंबई आणि पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. सध्यस्थितीला राज्यात सुमारे 100 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून आम्ही सर्व पॉझिटिव्ह नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

Tags

follow us