Girija Raut : ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shiv Sena) माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर कौंटुंबिक हिंसाचाराचा (Domestic Violence) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची सून गिरिजा राऊत (Girija Raut) यांनी सासरे विनायक राऊत आणि पती गितेश राऊत (Gitesh Raut) यांच्यासह राऊत कुटुंबावर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे आरोप केले आहेत.
गिरिजा यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची व्यथा मांडली आहे. त्यांनी विनायक राऊत आणि गितेश राऊत यांच्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. राऊत कुटुंबाने माझी फसवणूक केली आहे. गितेश राऊत यांच्यासोबत लग्न करण्याआधी त्यांच्याबद्दलची सत्यता माझ्यापासून लपवली, तसेच 2017 ते 2018 पर्यंत आमच्यामध्ये कोणताही शारीरिक संबंध झालेला नव्हता. याबद्दल विचारणा केल्यावर गितेश राऊत आणि राऊत कुटुंबिय माझा शारीरिक आणि मानसिक छळ करायचे, असे गिरिजा राऊत म्हणाल्या.
तसेच गितेश यांनी मला या प्रकरणाबद्दल कोठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली आहे. “माझ्या वडिलांनी निवडणूकीत 2 कोटी रुपये लावले आहेत. तुझ्यामुळे जर त्यांच्या इमेजला धक्का लागला तर बघ मी तुझ्यासोबत काय करतो”, अशा धमक्या गितेश यांनी मला दिल्या आहेत, असे गिरिजा यांनी सांगितले.
गितेश यांची शारीरिक अक्षमता लपवण्यासाठी उलट माझ्यावरच अघोरी पुजा करण्यात आल्या होत्या, जेणेकरुन माझ्यातच काहीतरी दोष आहे, असं मला वाटलं पाहीजे. म्हणून त्यांनी हे अघोरी कृत्य करुन मला मानसिक त्रास दिला आणि गेली 7 ते 8 वर्ष असाच माझा छळ होत गेला. हे अघोरी पुजा करणारे भोंदूबाबा सिंधुदुर्ग पट्ट्यातले होते. असे धक्कादायक खुलासे गिरिजा राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाबाबत विनायक राऊत आणि गितेश राऊत या पितापुत्रांवर कोणती कारवाई केली जाईल याकडे लक्ष लागलेले आहे.
फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध
तर पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत पती गितेश राऊत यांच्यावर देखील गिरीजा राऊत यांनी धक्कादायक आरोप केले आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की, शारीरिक संबंधांवर माझ्या पतीचे असे मत होते की, तो फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो. भारतात सेक्स करायला तो कंर्फटेबल नाही. शारीरिक जवळीक साधल्यास मला दूर लोटत तो मला सांगायचा की मी नाजूक मुलगा आहे, तुला अक्कल आहे का, मला असा कसा हाथ लावतेस तू? मुंबईच्या घरी जवळीक साधल्यास आपण इथे कसं काही करणार आईला सगळं ऐकी जाईल.
कौटुंबिक हिंसाचार; माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल-
तळगाव, मालवणच्या घरी जवळीक साधल्यास म्हणायचा इकडे आपण कीह करु शकत नाही, खाली रवी दादाला सगळं ऐकू जाईल असे आरोप गिरीजा राऊत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केले आहे. त्यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे.
