कौटुंबिक हिंसाचार; माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल
Vinayak Raut : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणी
Vinayak Raut : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणी त्यांच्यावर ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विनायक राऊत यांच्या सून गिरिजा गीते यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी सासरे विनायक राऊत आणि पती गितेश राऊत यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
गिरीजा गीते (Girija Gite) यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि नगरसेवक गितेश राऊत (Gitesh Raut) या पितापुत्रांवर कौटुंबिक हिंसाचार आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच जादूटोणा करण्यात साथ देणारे फिरोज बाबा आणि काजी बाबा यांच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गिरिजा यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे मागील 8 वर्षांपासून त्यांचा छळ सुरु होता. त्यांना राऊत कुटुंबिय शारीरिक व मानसिक त्रास देत होते. तसेच जादूटोणा केल्याचा आरोपही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. आता या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस करत आहेत.अद्याप विनायक राऊत यांच्या कुटुंबियांनी यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
आमिर खान लव जिहादचा ब्रँड अॅम्बेडेसर, हज घोटाळ्यावर विरोधक बोलणार का? मंत्री राणे भडकले