बीड जिल्हाच केंद्रशासित करा, तेथे हैवानांचा हैदोस; विनायक राऊतांची मागणी

  • Written By: Published:
बीड जिल्हाच केंद्रशासित करा, तेथे हैवानांचा हैदोस; विनायक राऊतांची मागणी

Vinayak Raut : सरपंच संतोष देशमु (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण गेले महिनाभर ढवळून निघाले. देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हातील गुंडगिरी चर्चेत आली. बीडमधील गुन्हेगारी, दहशत आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधकांनी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. यातच आता ठाकरे गटाचे नेते विनायक राऊ (Vinayak Raut) यांनी बीड (Beed) जिल्हा केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे. तसेच तिथे हैवानांचा हैदास सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

Steve Jobs ची पत्नी शिवलिंगाला स्पर्श का करू शकली नाही? ‘हे’ आहे कारण 

विनायक राऊतांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांत ज्या प्रकारे हत्या होत आहेत, लैंगिक अत्याचार, खून पडताहेत, त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे उद्धवस्त झाली. कोणालाही कायद्याचा धाक राहिलेला नाही. बीडमध्ये ज्या पद्धतीने दोन हजारांहून अधिक रिव्हॉल्व्हर परवाने देण्यात आले आहेत. ही बाब चिंताजनक आहे. ते जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

Steve Jobs ची पत्नी शिवलिंगाला स्पर्श का करू शकली नाही? ‘हे’ आहे कारण 

पुढं ते म्हणाले की, बीड घटनेमुळे देशभरात महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली आहे. बीड प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. पण, ते गुंडांना पायबंदही घालत नाहीत, असा टोला राऊतांनी लगावला. अशा परिस्थितीत, जर बीडमधील जनजीवन सुरळीत ठेवायचे असेल आणि येथील लोकप्रतिनिधींना चांगले काम करण्याचे वातावरण उपलब्ध करून द्यायचे असेल तर बीडमधील संपूर्ण प्रशासन व्यवस्था केंद्रशासित करण्याची गरज आहे. असे झाले तरच बीडमध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदेल. अन्यथा लोकप्रतिनिधी आणि सरपंचांचे अनेक बळी जाण्याची शक्यता आहे, अशी भीतीही राऊत यांनी व्यक्त केली.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, विष्णू चाटेच्या कोठडीत वाढ 

बीड जिल्ह्यात हैवानांचा हैदोस सुरू असून त्यावर आळा घालण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचंही ते म्हणाले.

कोणत्या आरोपीवर मोक्का लावण्यात आला?

आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात ७ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि महेश केदार यांचा समावेश आहे. धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड याच्याविरुद्ध आवादा कंपनीकडून २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्याच्यावर मकोका अंतर्गत कोणतीही कारवाई झालेली नाही.

विष्णू चाटेला १४ दिवसांचा कोठडी…
दरम्यान, संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याला आज केज कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने विष्णू चाटेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी केज कोर्टाने विष्णू चाटेची दोन दिवसांच्या सीआयडी कोठडीत रवानगी केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube