अजित पवारांना “पद्मविभूषण” द्या ; कोपरगावचे आमदार काळे यांची मागणी

MLA Ashutosh Kale : 'दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मरणोत्तर 'पद्मविभुषण' हा राष्ट्रीय सन्मान देण्यात यावा तशी शिफारस राज्य सरकारने

MLA Ashutosh Kale

MLA Ashutosh Kale

MLA Ashutosh Kale : ‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मरणोत्तर ‘पद्मविभुषण’ हा राष्ट्रीय सन्मान देण्यात यावा तशी शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन आमदार काळे (Ashutosh Kale) यांनी त्यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे , “महाराष्ट्राच्या राजकारणात 40 पेक्षा जास्त वर्ष सक्रिय असणाऱ्या अजितदादा यांचे राजकीय, सामाजिक, शेती, सहकार, शिक्षण आदी विभागांसह महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी असलेला ‘पद्मविभुषण‘ हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव करण्यात यावा, अशी राज्याच्या जनतेचीही भावना आहे. त्यासाठी राज्य सरकारने केंद्र शासनाकडे शिफारस करावी.”

मोठी बातमी! चंद्रपूरमध्ये भाजपच्या संगीता खांडेकर महापौर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामती येथे एका विमान अपघातात निधन झालं होतं. अजित पवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना बारामती येथे विमान अपघातात त्यांचं निधन झालं होतं.

टॅक्सच्या नावाखाली मुंबईकरांची लूट सुरू होणार? भाजपच्या ‘त्या’ पत्रावरून आदित्य ठाकरेंचा संताप!

Exit mobile version