Download App

‘डेटा द्या… 8 दिवसात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो’, जयंत पाटील कार्यकर्त्यांवर भडकले

Jayant Patil : विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCPSP) पक्षात सर्वकाही ओके नसल्याचे

  • Written By: Last Updated:

Jayant Patil : विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCPSP) पक्षात सर्वकाही ओके नसल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षांतर्गत प्रदेशाध्यक्ष बदल्यात यावा अशी मागणी काही जणांकडून करण्यात येत आहे. तर आता विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाने आपल्या वॉर्डात पक्षाला किती मतं दिली त्याचा डेटा पुढील दोन दिवसात द्या, आठ दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो. असं राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. तसेच पक्ष चालवणं हे काही सोपं काम नाही, सगळ्यांना एकत्र घेऊन काम करावं लागलं असंही ते म्हणाले.

समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी मागणी केली होती त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

या बैठकीत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, पक्ष चालवणं हे काही सोपं काम नाही, फक्त जोरदार भाषण करून उपयोग नसतो तर डोकं शांत ठेऊन आक्रमक कार्यकर्त्यांसह शांत कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचे काम करावे लागते. प्रत्येकाने पुढील दोन दिवसात विधानसभा निवडणुकीत आपल्या आपल्या वॉर्डात पक्षाला किती मत मिळवून दिली ते सांगा, त्यानंतर आठ दिवसात राजीनामा देतो असं जयंत पाटील म्हणाले. तसेच मी एकटा कितीवेळा काम करायचं? आठ दिवसाचा वेळ द्या स्वत:हून प्रदेशाध्यक्षपद सोडतो. निडणुकीत बुथवर काम केल्याचा डेटा द्या. कुणी काय काम केलं याची सविस्तर माहिती द्या. त्यांतर पदावरून बाजूला होतो. बोलणं सोपं असतं पण चांगला माणूस मिळणं अवघड असतं. असेही यावेळी जयंत पाटील म्हणाले.

GST मध्ये बदल करण्याची गरज, मध्यमवर्ग व छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा द्या, सचिन पायलट यांचा हल्लाबोल

तर दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत झाल्याने पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी काही कार्यकर्त्यांनी केली आहे. कार्यकर्त्यांनी आपली भावना शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

follow us