जयंत पाटील, रोहित पवार हे कॉपी करून पास झालेत काय ? सदाभाऊ खोतांकडून खरपूस समाचार
Sadabhau Khot On Jayant Patil and Rohit Pawar: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसलाय. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून इव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांनी काही मशीनची मते मोजणीची मागणी केलीय. त्यासाठी लाखो रुपये भरले आहेत. त्यावरून भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी लेट्सअपशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार निशाण साधलाय. शरद पवार गटाचे आमदार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांचा तर त्यांनी जोरदार समाचार घेतलाय.
निवडणुकीतील पराभवामुळे विरोधक संतापले म्हणून …, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
सदाभाऊ खोत म्हणाले, लोकसभेला संविधान बचाव नारा, त्यांनी दिला होता. संविधानामध्ये मोडतोय काँग्रेसच्या काळात झाली आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर संविधान दिन सुरू झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारके झाली. आता काँग्रेसचे लोक कांगावेखोर आहेत. इव्हीएम मशीन तुम्ही आणले. दोन निवडणूक तुम्ही जिंकल्या. इव्हीएम मशीनमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणता मग 2004, 2009 बदल करून तुम्ही निवडणूक जिंकल्या आहेत. त्याचे उत्तर द्या. वीस देशामध्ये इव्हीएम वापरले जात आहे. एका बाजूला राजीव गांधी यांनी कॅम्प्ट्युर आणले आहे. नवतंत्रज्ञान राजीव गांधी आणले आहे. टीव्ही राजीव गांधी यांनी आणला, असे सांगता. इव्हीएम तुम्हीच आणलं आहे. आता तुम्ही पळ का काढत आहात? तंत्रज्ञानाला विरोध केला जात आहे. काँग्रेसमध्ये आता बांडगूळ राहिले आहेत. तेच आता नवतंत्राला विरोध करत जात आहेत. इव्हीएममागे लपायला निघाले आहेत.
अखेर, महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला! भाजप मोठा भाऊ तर शिंदे – पवारांच्या पारड्यात काय?
जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, रोहित पवार, नाना पटोले हे निवडून आले आहेत. त्यांनी इव्हीएममध्ये गडबड केली आहे. तेच का निवडून आले आहेत का ? या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेने खऱ्या अर्थाने एकहाती सत्ता दिली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला लोक कंटाळले होते. लोकसभेला निवडणूक तुम्ही देवाच्या भरवशावर सोडून दिली होती. शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतामध्ये सडत होते. दूधाचे पैसे दूध संघांनी लाटले. महायुतीने डायरेक्ट सात रुपये लिटरमागे दूध उत्पादकांच्या खात्यावर टाकले आहे. जयंत पाटील, रोहित पवार हे चांगले शिकलेले आहेत. मशीन हॅक होतं म्हणता तूम्ही काय कॉपी करून पास झाले आहेत का ? असा सवाल खोत यांनी केला आहे.