Download App

MBBS Exam : एमबीबीएस शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; विद्यार्थ्यांना मिळणार ‘ही’ संधी

MBBS Exam : एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी (Good News)समोर आली आहे. सन 2019-20 मध्ये एमबीबीएसचे प्रथम शैक्षणिक वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचव्यांदा परीक्षा देण्याची संधी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

कर्नाटकमधील काँग्रेसचे रियल वॉरिअर, भाजपच्या प्रत्येक अजेंड्याला दिला छेद

2019-20 या काळात प्रथम वर्ष एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar)यांना भेटून याबद्दल विनंती केली होती. कोविड विषयक तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन मंत्री पवार यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे (NMC) पाठपुरावा व केंद्रीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत विस्तृत चर्चा करुन या विद्यार्थ्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.

एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आधीच्या नियमानुसार पहिल्या चार प्रयत्नांमध्ये त्यांची पहिली व्यावसायिक एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक होते. मात्र 2019-20 या काळात कोविड-19 च्या काळात वैद्यकीय विद्यालये बंद होती. त्यामुळे या काळातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नसल्याची माहिती समोर आली आहे.

या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून त्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पाचव्यांदा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करुन देण्याची भूमिका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केंद्रीय वैद्यकीय आयोगापुढे (NMC) मांडली. डॉ. पवार यांच्या भूमिकेला मान्यता देत त्या विद्यार्थ्यांसाठी पाचव्या वेळी परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी ही मान्यता दिली आहे.

Tags

follow us