कर्नाटकमधील काँग्रेसचे रियल वॉरिअर, भाजपच्या प्रत्येक अजेंड्याला दिला छेद

कर्नाटकमधील काँग्रेसचे रियल वॉरिअर,  भाजपच्या प्रत्येक अजेंड्याला दिला छेद

Karnataka Election result: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमताने विजयी झाली आहे. या विजयाचे आता वेगवेगळ्या पध्दतीने विश्लेषण केले जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री सिध्दारमय्या (Siddaramaiah), काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना विजयाचे श्रेय दिले जात आहे. पण काँग्रेसच्या विजयात पडद्याआड असलेल्या काही राजकीय थिंक टँकचा समावेश आहे. त्यामध्ये वॉररूमचे वॉरिअर ‘शशिकांत सेंथिल’ (Shashikant Senthil) आणि रणनितीकार ‘सुनील कानुगोलु’ (Sunil Kanugolu) यांचा समावेश होता.

काँग्रेसच्या वॉररूमचे वॉरिअर ‘शशिकांत सेंथिल’
शशिकांत सेंथिल काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी आयएएस अधिकारी होते. कर्नाटक कॅडरचे आयएएस अधिकारी शशिकांत सेंथिल यांनी 2009 मधील निवडणुकीत काँग्रेसच्या वॉररुमचे प्रभारी म्हणून मुख्य भूमिका निभावली होती. 2019 मध्ये त्यांनी प्रशासकीय नोकरीचा राजीनामा दिला होता आणि 2020 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जुलै 2022 मध्ये त्यांच्यावर वॉररुमची जबाबदार सोपवण्यात आली होती. शशिकांत सेंथिल यांनी निवडणुकीदरम्यान एकेका जागेचा आढावा घेतला होता आणि वरिष्ठ नेत्यांना अहवाल पाठवले होते.

डी. के. शिवकुमार यांचा सिद्धरामय्यांना पाठिंबा; सिद्धरामय्या मुख्यमंत्री होणार?

सत्यतपासणीबरोबरच भाजप नेत्यांच्या विधानांवर उलटवार करण्यासाठी सेंथिल यांच्या नेतृत्वाखाली एक पथक काम करत होते. सेंथिल मूळचे तामिळनाडूचे रहिवासी आहेत. कॉग्रेसमध्ये प्रवेश करताना ते म्हणाले की, कर्नाटकमध्ये भाजप हिंदुत्वाच्या नावावर फूट पाडण्याचे राजकारण करीत होी. म्हणून मी आयएस नोकरीचा राजीनामा दिला, असे त्यांनी सांगितले होते.

काँग्रेसचे रणनितीकार ‘सुनील कानुगोलु’
सुनील कानुगोलु हे कर्नाटकात काँग्रेसच्या विजयासाठी रणनीती बनणारं नाव आहे. संपूर्ण निवडणुकीदरम्यान त्यांनी जनतेशी विस्तृत आणि तपशीवर संपर्क साधला. त्यासाठी त्यांनी रणनिती आखली. भाजपच्या भाषणं आणि अजेंड्याला छेद देत त्यांनी भ्रष्टाचार, गैरकारभाराच्या आरोपात अडकलेल्या भाजपशासित सरकारचा पर्दाफाश केला. प्रचाराच्या नवनवीन पद्धती शोधून काढणं, लोकांची नाडी जाणून घेण्यासाठी वेगवेगळी सर्वेक्षणं करणं आणि त्याद्वारे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रणनिती आखणं ही जबाबदारी सुनील कानुगोलु यांच्या खांद्यावर होती.

सुशीलकुमार शिंदेंकडे मोठी जबाबदारी, ‘कर्नाटकचा मुख्यमंत्री फायनल करणार’

गेल्या वर्षी मार्चमध्ये काँग्रेसनं सुनील कानुगोलु यांना निवडणूक रणनितीकार म्हणून पक्षात स्थान दिलं होतं. काँग्रेसनं गेल्या वर्षी मे महिन्यात 2024 साठी टास्क फोर्सची स्थापना केली होती. यामध्ये निवडणूक रणनीतीकार सुनील कानुगोलु यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. सुनील कानुगोलु यांनी यापूर्वी डीएमके, एआयएडीएमके आणि भाजपसोबत काम केलं आहे. त्यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपसाठी तर 2019 च्या संसदीय निवडणुकीत डीएमके आणि 2021 च्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूमध्ये AIADMK साठी रणनिती तयार केली.

माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या अनुपस्थितीत त्यांनी AIADMK साठी रणनिती आखली आणि पक्षानं चमकदार कामगिरी केली होती. सुनील कानुगोलु यांनी 2014 च्या आधी प्रशांत किशोर यांच्यासोबतही काम केलं होतं. मॅकिन्से याचे पूर्व सल्लागार सुनील कानुगोलु हे 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या निवडणुक प्रचाराचे प्रमुख घटक होते. सुनील कानुगोलु यांच्याकडे आता तेलंगणा, राजस्थान आणि छत्तीसगडमधील काँग्रेसच्या रणनितीची जबाबदारी देण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube