Download App

हाकेंचं ठरलं! सरकारसोबत चर्चेसाठी स्पेशल फौज जाणार; भुजबळांच्या हाती कमान

लक्ष्मण हाके यांच्याशी सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. सरकार आज सायंकाळी बैठक घेणार आहे. काय निर्णय होतो हे पाहण महत्वाचं आहे.

  • Written By: Last Updated:

Government Delegation Meet Laxman Hake : गेली नऊ दिवसांपासून अमरण उपोषणासाठी बसलेलेल्या लक्ष्मण हाके यांची भेट घेऊन अखेर सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरू हाके यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. त्यामुळे आता हाके मुख्यमंत्र्यांचं ऐकतात का? हे पाहण महत्वाचं आहे. शिष्टमंडळ आणि उपोषणकर्ते यांच्यात चर्चेला सुरुवात झाल्यावर शिष्टमंडळाकडून उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांना कागदपत्र देण्यात आले.

मोठी बातमी : दिल्ली उच्च न्यायालयाचा केजरीवालांना झटका; जामीन स्थगित, तुरूंगातून बाहेर येणं लांबलं

हाके यांच्या काय मागण्या आहेत त्यासाठी आज सायंकाळी 5 वाजता सरकारची बैठक होणार आहे. त्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी आपलं शिष्टमंडळ पाठवावं असं आवाहन फडणवसी यांनी हाके यांना केल आहे. तसंच, आम्ही कोणत्याही घटकावर अन्यान न होऊ देता निर्णय घेणार आहोत अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. ते सरकारचे शिष्टमंडळ म्हणून हाके यांना भेटण्यासाठी आले होते.

ओबीसी बचाव संदर्भाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांचं बोलण आश्वासक वाटलं का? या प्रश्नावर आम्हाला लेखी पत्र मिळाल्यानंतरच आम्ही विश्वासू ठेऊ असंही हाके यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, शिंष्टमंडळामध्ये मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद डळकर, प्रकाश शेंडगे आणि महादेव जानकर यांचा समावेश असावा असं हाके म्हणाले आहेत.

शिंदे यांना टेन्शन : मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याविना महायुती विधानसभा लढणार?

लक्ष्मण हाके यांचे जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीमध्ये बेमुदत उपोषण सुरू आहे. वडीगोद्री हे अंतरवाली सराटीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे. हाके यांचं सध्या आंदोलन सुरू आहे. तर काही दिवासांपूर्वी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं आहे. त्यांनी सुमारे 10 महिने येथे अंदोलन केलं आहे.

follow us