सरकारकडून शिक्षकांना खास ख्रिसमस गिफ्ट, मासिक मानधनात ‘एवढी’ वाढ

नागपूर : राज्यातील शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात १२ वर्षांनंतर मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना सरकारकडून खास ख्रिसमस गिफ्ट मिळाले आहे. त्यामुळे आता राज्यातील शिक्षण सेवकांचे मासिक मानधन हे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या प्रवर्गांना आधी अनुक्रमे 6 हजार, 8 हजार, 10 हजार अशा प्रकारे मासिक मानधन मिळत होत. आता सुधारित मासिक मानधनाप्रमाणे राज्यातील […]

Tet Exam 100_202010508158

Tet Exam 100_202010508158

नागपूर : राज्यातील शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात १२ वर्षांनंतर मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना सरकारकडून खास ख्रिसमस गिफ्ट मिळाले आहे. त्यामुळे आता राज्यातील शिक्षण सेवकांचे मासिक मानधन हे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या प्रवर्गांना आधी अनुक्रमे 6 हजार, 8 हजार, 10 हजार अशा प्रकारे मासिक मानधन मिळत होत.

आता सुधारित मासिक मानधनाप्रमाणे राज्यातील शिक्षण सेवकांना 6 ऐवजी 16 हजार, 8 ऐवजी 18 हजार, 10 ऐवजी 20 हजार अशा प्रकारे मासिक मानधन मिळणार आहे. या मानधनात वाढ केल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक १४४ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अलीकडेच ही घोषणा केली होती.

यामध्ये आणखी आनंदाची बातमी म्हणजे ३० हजार शिक्षकांची जी भरती राज्यात होणार आहे त्यांनादेखील नवीन मानधन लागू केले जाणार आहे. अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सुरुवातीला ते पाच हजार रुपयांपर्यंत मानधन मिळत होते. २०११ मध्ये आघाडी सरकार असतानाच ते वाढविण्यात आले.

Exit mobile version