मुंबई : गुढीपाडवा (Gudhipadwa)आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)होते. या योजनेचा लाभ 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना होणारंय.
याआधी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर (Nagpur)विभागातील वर्धा (Wardha)अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना 1 किलो रवा, 1 किलो चनाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील 1 महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे 100 रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाणारंय. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीनं हा शिधा देण्यात येणारंय.
Sharad Pawar : निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेतं की त्यांच्यापाठी कोणी आहे?
अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आलाय. त्यासाठी 5 हजार 177 कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता मिळाली आहे. त्यामुळं 68 हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ मिळणारंय. राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. एकनाथ शिंदे यांना पक्षचिन्ह आणि शिवसेना नाव मिळाल्यावर पहिली बैठक झाली. या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय.
प्रवरा नदीवर निळवंडे गावाच्या वरील बाजूला हे दगडी धरण बांधण्यात येतंय. धरणातून डावा कालवा सुरू होऊन तो 85 किलोमीटर लांबीचा आहे. नदीच्या उजव्या बाजूनं जाणारा कालवा 97 किलोमीटरचा आहे. या दोन्ही कालव्यांमधून 68 हजार हेक्टर क्षेत्राचं सिंचन होणं अपेक्षित आहे.
2027 पर्यंत या प्रकल्पाचं कालव्यासह संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात येणारंय. हा प्रकल्प पूर्ण होताच अकोले, संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव तसेच नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागातील 182 गावांना सिंचनाचा फायदा होणार असल्याची माहिती आहे.