भारतीय जनता पक्ष आपल्या विशेष कार्यपद्धतीमुळे कायम चर्चेत असतो. त्यातही पक्षाकडून केलेले सर्वे हा कायम चर्चेचा विषय असतो. त्यातही अगदी उमेदवारी देताना किंवा कोणताही निर्णय घेताना सर्वे हा कायमच समोर येतो. त्यामुळे भाजपचा कोणताही निर्णय आला की त्यामागून आमचा सर्वे असा होता, असं त्यांच्या नेत्याकडून सांगण्यात येतं.
असाच एक सर्वे भाजपकडून राज्यातील सर्व आमदारांचा केला असल्याची माहिती समोर आली आहे. ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार भाजपकडून त्याच्या सध्याच्या सर्व आमदारांच्या मतदारसंघात एक विशेष सर्वे करण्यात आला आहे. दिल्लीतील एका खासगी कंपनीने हा सर्वे केला आहे.
“एप्रिल फुलचा दिवस म्हणजे मोदी विकासाचा वाढदिवस” राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एप्रिल फुल आंदोलन
चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं रिपोर्ट कार्ड
दिल्लीतील या कंपनीच्या रिपोर्टच्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व आमदारांच्या विभागवार बैठक घेतल्या असून त्यामध्ये सर्व आमदारांना त्यांचे रिपोर्ट देण्यात आले. त्यामध्ये आमदारांना त्यांच्या सध्याच्या कामात चालू असलेल्या उणीवा सांगण्यात आल्याचं आहेत, सोबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सांगितलं आहे.
विधानसभा निवडणुकीला अजून दीड वर्ष बाकी आहे. पण तरीही भाजपने आतापासून उमेदवारांना तयारीला लागा, असं सांगितलं आहे. त्याच पार्शभूमीवर असा रिपोर्ट कार्ड तयार त्यांनी विधानसभेची तयारी सुरु केळ्याचंच सांगितलं आहे. आमदारांची एकूण कामगिरी, त्यांनी कोणती विकासकामे केली, कोणती केली नाहीत, मतदारांशी त्यांचा संपर्क किती आहे, ते जनतेच्या समस्या किती गतीने सोडवतात, मतदारसंघातील भाजप पक्षसंघटनेशी त्यांचे संबंध चांगले आहेत की वाईट याचा उल्लेख या रिपोर्ट मध्ये केला आहे.
Donald Trump : पॉर्नस्टार, पैसा आणि डोनाल्ड ट्रम्प; डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होणार? काय आहे प्रकरण
तिकीट वाटपात गुजरात पॅटर्न
पण राज्यात अचानक केलेल्या या सर्वेमुळे राज्यात देखील तिकीट वाटपात गुजरात पॅटर्न राबवला जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभेत तिकीट वाटपात भाजपने आपल्या सर्वेचा वापर करून तिकीट वाटपात अनेकांचे पट्टे कट केले होते, त्यामुळे राज्यात देखील असे सर्वेचा वापर करून तिकीट वाटप केल्यास आपलं तिकीट तर जाणार नाही ना, याची भीती भाजप उमेदवारांना सतावू लागली आहे.