आम्ही शिवसेनेत काम सुरू केलं ते हिंदुत्वासाठी. (Shivsena) लोकांच्या रक्षणासाठी. आमचं धोरण आणि तोरण ठरवणारे कोण तर एकच ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. पुढे सायकलवर प्रवास करत शिवसेनेचा प्रचार केला. मी टपरी चालवणारा आमदार झालो, रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे आमदार झाले. पुढे मुंबईवर कब्जा मिळवला. महाराष्ट्रात सत्ता मिळायला लागली. पुढे सत्तेच विकेंद्रीकरण झालं. ज्या माणसाला मोटारसायकडं चालवायचं लायसन नव्हत त्या माणसाला ट्रकच लायसन दिलं गेलं आणि ठिणगी पडली असं म्हणत शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांवर जोरदार टीका केली.
वर्धापन दिनाचा हिरकमहोत्सवी ६० हा आकडा नाही, संस्कार आहे. निष्ठा आहे. संघर्षाचा आधार आहे. १९८६ मध्ये मी शिवसेनेत आलो. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेचं काम सुरू केलं. आज आठवतंय, त्या ६० वर्षाची फलश्रृती म्हणून गर्दी दिसत आहे. यात शिवसैनिक दिसत आहेत. ४०-४० वर्ष काम करणारे शिवसैनिक आणि नवे शिवसैनिक आहेत.
संजय राऊत तू शांत बसला नाही तर घरात घुसून, शिवसेना नेते रामदास कदमांकडून राऊंतावर थेट वार
त्यावेळी सत्ता नव्हती, पैसा नव्हता, वाहनं नव्हती, फक्त एकच विश्वास होता मराठी माणसांवर होणारा अन्याय आणि हिंदूवर होणारा अन्याय आणि हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी संघटनेच्या विचाराच्या भरवश्यावर काम सुरू झालं. तेव्हा मोबाईल नव्हता, एसी नव्हता, सायकलवरून प्रचार व्हायचा. एकच ध्यास होता तो म्हणजे शिवसेनाप्रमुखांचा होता असेही पाटील म्हणाले.
वर्धापन दिनाचा हिरकमहोत्सवी ६० हा आकडा नाही, संस्कार आहे. निष्ठा आहे. संघर्षाचा आधार आहे. १९८६ मध्ये मी शिवसेनेत आलो. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेचं काम सुरू केलं. आज आठवतंय, त्या ६० वर्षाची फलश्रृती म्हणून गर्दी दिसत आहे. यात शिवसैनिक दिसत आहेत.
४०-४० वर्ष काम करणारे शिवसैनिक आणि नवे शिवसैनिक आहेत. त्यावेळी सत्ता नव्हती, पैसा नव्हता, वाहनं नव्हती, फक्त एकच विश्वास होता मराठी माणसांवर होणारा अन्याय आणि हिंदूवर होणारा अन्याय आणि हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी संघटनेच्या विचाराच्या भरवश्यावर काम सुरू झालं. तेव्हा मोबाईल नव्हता, एसी नव्हता, सायकलवरून प्रचार व्हायचा. एकच ध्यास होता तो म्हणजे शिवसेनाप्रमुखांचा होता असेही पाटील म्हणाले.
