Sharad Pawar : शरद पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन; म्हणाले, महाविकास आघाडी..

Sharad Pawar : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि चिन्ह देऊन टाकले. त्यानंतरही काही निर्णय ठाकरे गटाच्या विरोधात गेले. तसेच आज शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळातील पक्ष कार्यालयाचाही ताबा घेतला. या सगळ्या घडामोडींत उद्धव ठाकरेंची मोठी कोंडी झाली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इरादाही उद्धव ठाकरे यांनी बोलून […]

Sharad Pawar 2

Sharad Pawar 2

Sharad Pawar : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि चिन्ह देऊन टाकले. त्यानंतरही काही निर्णय ठाकरे गटाच्या विरोधात गेले. तसेच आज शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळातील पक्ष कार्यालयाचाही ताबा घेतला. या सगळ्या घडामोडींत उद्धव ठाकरेंची मोठी कोंडी झाली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इरादाही उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविला आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फोन करून दिलासा दिला. महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी आहे, असेही सांगितले.

हे वाचा : Shiv Sena Party Office : पक्षाचे चिन्ह गेले, नाव गेले आता कार्यालयावरही शिंदे गटाचा कब्जा..

राज्यात सध्या राजकीय घडामोडी वेगात घडत आहेत. धनुष्यबाण आणि शिवसेना नाव गेल्यानंतर ठाकरे गटातील नेते कमालीचे आक्रमक झाले असून शिंदे गटावर जोरदार टीका केली जात आहे. याआधीच शरद पवार यांनी ठाकरे यांना निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य करण्याचा सल्ला दिला होता.या सगळ्या घडामोडींनंतर पवार यांनी फोनद्वारे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.

या संभाषणादरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयावर दोघात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. कायदेशीर लढाईबाबतही पवार यांनी ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केली. तसेच या प्रसंगी महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी उभी असल्याचेही पवार म्हणाले.

 

Exit mobile version