Shiv Sena Party Office : पक्षाचे चिन्ह गेले, नाव गेले आता कार्यालयावरही शिंदे गटाचा कब्जा..

Shiv Sena Party Office : पक्षाचे चिन्ह गेले, नाव गेले आता कार्यालयावरही शिंदे गटाचा कब्जा..

Shiv sena Party Office : निवडणूक आयोगाच्या पक्षचिन्हाच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस न्यायालयाने नकार दिल्यानंतर ठाकरे गटाला झटका बसलेला असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. शिंदे गटाने आक्रमक होत विधानभवनातील शिवसेना (Shiv Sena Party Office) पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला आहे. शिंदे गटाचे प्रतोद आमदा भरत गोगावले काही आमदारांसह विधीमंडळात दाखल झाले आणि शिवसेना (Shiv Sena) कार्यालयाचा ताबा घेतला. यावेळी संजय रायमुलर, चिमणराव पाटील आदी आमदार उपस्थित होते. शिंदे गटाने शिवसेनेच्या नावावरील सर्व वास्तू ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाने आज आपला पहिला मोर्चा विधीमंडळातील शिवसेनेच्या कार्यालयाकडे वळवला.

मुंबईत झालेल्या अधिवेशन काळात पक्ष कार्यालयावरून वाद निर्माण झाले होते. या कार्यालयावर शिंदे आणि ठाकरे गटाने दावा सांगितल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी या कार्यालयाला सील केले होते. आज हे कार्यालय शिंदे समर्थकांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा : Supreme Court : ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाने फटकारले.. पक्षचिन्हाच्या याचिकेवर तातडीने सुनावणीस नकार  

याआधी ठाकरे गटाकडे या कार्यालयाचा ताबा होता. येथे असलेले बोर्ड आणि बॅनर हटविण्यात आले. त्यानंतर भरत गोगावले यांनी आमदारांसह या कार्यालयावर ताबा घेत म्हटले, की आता शिवसेना हा आमचा पक्ष आहे. यापुढे इतर कार्यालये ताब्यात घेण्यासाठी कायदेशी प्रयत्न करणार आहोत.

आम्ही विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतलेला नाही तर प्रवेश केला आहे. त्यासाठी आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. हे शिवसेना पक्षाचे कार्यालय आहे आणि आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत.अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर आम्ही तयारी केली आहे. कार्यालय ताब्यात घेण्यासाठी आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया भरत गोगावले यांनी पूर्ण केली आहेड, असे सदा सरवणकर यांनी सांगितले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube