Download App

हर्षवर्धन जाधव म्हणाले … तर मी निवडणूक देखील लढवणार नाही

  • Written By: Last Updated:

Harshvardhan Jadhav: आगामी काळात राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुका या होणार आहे. यातच अनेक पक्षांकडून निवडणुकांच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी सुरु आहे. सध्या राज्यात देखील निवडणुकांच्या अनुषंगाने नेतेमंडळी विविध ठिकाणचे दौरे करत आहे. दरम्यान हर्षवर्धन जाधव हे बीआरएस पक्षाकडून लोकसभा की विधानसभा कोणती निवडणूक लढवणार? याबाबत खुद्द जाधव यांनी स्पष्ट केले. आपल्याला पक्ष जो आदेश देईल ते आपण करू. तसेच आपल्याला निवडणूक न लढवण्यास जरी सांगितली तरी आपण ते करू अशी प्रतिक्रिया माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे. (Harshvardhan Jadhav said … then I will not even contest elections)

बीआरएसचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे आज अहमदनगर येथे आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. जाधव यांना आगामी निवडणुक आपण लोकसभा लढवणार की विधानसभा याबाबत विचारण्यात आले. यावर बोलताना जाधव म्हणाले, पक्ष मला जो आदेश देईल तो माझ्यासाठी अंतिम राहील. पक्षाने सांगितले की विधानसभा लढवा किंवा पक्षाने सांगितले की लोकसभा लढवा त्या उमेदवारीवर मी लढेल. तसेच पक्षाने सांगितले की निवडणूक लढवू नका तर मी निवडणूक देखील लढणार नाही असे जाधव म्हणाले आहे.

शिंदेंच्या सेनेत जाताच गोऱ्हेंसाठी अंधारे झाल्या सटर-फटर….

सध्या बीआरएस पक्ष महाराष्ट्रात देखील आपले पाय रोवू लागला आहे. यातच पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्र दौरा केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले आहे. दरम्यान हर्षवर्धन जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. यातच आता पक्षाच्या प्रचारासाठी त्यांनी देखील पाऊले उचलली आहे.

आमचा पक्ष हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना महत्व देत त्यांच्या समस्यां सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आज देश संकटात आहे. देशावर कर्जाचा मोठा डोंगर निर्माण झाला आहे. तुमच्याकडे विकायला काही राहिले नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. जे काही राहील आहे तेही तुम्ही विकलं तर देश भविष्यात बुडेल अशी अवस्था सध्या देशात निर्माण झाली आहे. जर आपल्याला देशाला वाचवायचे असेल तर बीआरएस शिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. कोण आमदार होतोय तर कोण खासदार होतोय यापेक्षा देश कसा वाचला जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

Tags

follow us