शिंदेंच्या सेनेत जाताच गोऱ्हेंसाठी अंधारे झाल्या सटर-फटर….

शिंदेंच्या सेनेत जाताच गोऱ्हेंसाठी अंधारे झाल्या सटर-फटर….

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता ठाकरे गटालाही गळती लागलीय. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरेंना जय महारष्ट्र केला होता. तर एकनाथ शिदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभं राहणाऱ्या निलम गोऱ्हे यांनीही साथ सोडून एकनाथ शिंदेंचा हात धरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निलम गोऱ्हे यांनी शिवेसेनेत प्रवेश केला आहे. निलम गोऱ्हे यांनी ठाकरे गट सोडण्याचं कारण सुषमा अंधारे असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर निलम गोऱ्हे शिंदे गटात जाताच सुषमा अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांचा उल्लेख सटर-फटर असा केला आहे.

DIG विजय कुमार यांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलं, कारण अस्पष्ट…

निलम गोऱ्हें म्हणाल्या, मागील अनेक वर्षांपासून मी शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात काम करीत होते. शिवसेनेत मला चांगल काम करता आलं. सध्याची परिस्थिती पाहता महिला सक्षमीकरण, राज्याचा विकास आणि राजकीय विश्वासार्हता नसल्याने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय मी घेतल्याचं गोऱ्हें यांनी स्पष्ट केलंय.

Buldhana Bus Accident : ‘तो’ अपघात समृद्धी महामार्गामुळे नव्हे तर मद्यधुंद बस चालकामुळे?

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, भारतातील विविध विचारसरणीपैकी १९९२ नंतर द्वियीकरणात एनडीए व युपीए अशा राजकीय आघाड्या झाल्या आहेत. १९९८ साली महाराष्ट्रातील राजकीय विश्वासार्हता, मराठी व हिंदुत्व, महिला धोरण तसेच सामाजिक न्याय या प्रश्नावर असणारा एनडीएसोबत असणारा राजकिय पक्ष म्हणजे शिवसेना पक्षात मी प्रवेश केला होता. शिवसेनेत मला खूप चांगले काम करता आल्याचं त्यांनी सांगितलंय.

सद्यस्थितीत सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोगाने स्पष्ट निकाल दिला आहे की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अधिकृत आहे. केंद्रीय स्तरावर एनडीएने व भाजपच्या नेतृत्वाखाली अयोध्येत श्रीराम प्रभूचे मंदिर, तलाक पीडित महिलांना न्याय, काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज व राज्यघटनेत उल्लेख केलेल्या समान नागरी कायद्याबाबतची सकारात्मक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची वरील सर्व समस्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे. विशेषतः १९८५ च्या शहाबानो बेगम खटल्यात न्यायालयाने शहाबानोला पोटगी मिळावी, असा निर्णय दिला होता.

जावई आत येत असताना घरच्यांना परकेपणा वाटू नये ; सदाभाऊ खोतांचा भाजपला खोचक सवाल

तथापि विरोधाला व दबावाला बळी पडून तत्कालीन सरकारने मुस्लिम महिला (घटस्फोट अधिकारांचे संरक्षण) कायदा १९८६ संमत केला. परिणामी समाजातील विशिष्ट घटकातील स्त्रियांना दुजाभाव व अन्याय सहन करावा लागला. यातून हे स्पष्ट होते की सर्व महिलांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात समान न्याय मिळावा, अशी आवश्यकता असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व या भूमिकेसोबतच महिला विकासाला चालना, महिला व बालके, वंचित घटक, आदिवासी, असंघटित कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नावर धोरणात्मक व प्रत्यक्ष कामाची गरज आहे. हे सर्व काम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मी शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन करते व तसे काम करण्याचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

बैठक खेळीमेळीत, संभ्रम करुन पोळी भाजू नका, मंत्री उदय सामंतांनी सज्जड दम भरला…

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेक नेते उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेंच्या गोटात गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाल्या होत्या. उद्धव ठाकरे यांच्या गटात सुषमा अंधारे आल्याने अनेक महिला कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचं बोललं जात होतं. मात्र, याबाबत स्पष्ट समोर आलं नव्हतं.

मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात भाजपची तर जिरणार नाही ना? कार्यकर्त्यांचं फडणवीसांना पत्र

मात्र, काही दिवसांपासून महिला कार्यकर्त्यांचा शिंदे गटाकडे अधिक कल असल्याचं दिसतंय. नूकताच आमदार मनिषा कायदेंनी प्रवेश केला तर आता निलम गोर्हे यांनीही शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अचानक उद्धव ठाकरेंना का सोडावं लागतंय? याबाबत गोऱ्हें यांनी स्पष्टपणे भाष्य केलं नाही. मात्र,अप्रत्यक्षपणे सुषमा अंधारेंमुळे नाराज असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

Sanjay Raut : शिंदेंची खुर्ची संकटात? राऊतांनी सांगितलं नेमकं राजकारण!

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आमच्या पक्षात नाराजी वेगैरे असं कुठेच नसतं, जरी नाराजी वगैरे असली तरी पक्षाचे नेते आल्यानंतर ती सगळी नाराजी विसरत असतात. त्यातूनही अगदी सटर-फटर लोकांमुळे नाराज होण्याची परिस्थिती नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, राष्ट्रवादीत अजित पवारांमुळे घडलेल्या राजकीय भूकंपाचे हादरे महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांनाही बसू लागले आहेत. राष्ट्र्रवादीनंतर आता उद्धव ठाकरे गटाला गळतीच लागली असल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, विधानपरिषदेतील उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाचं सारंच आलबेल असल्याचं समोर आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube