जावई आत येत असताना घरच्यांना परकेपणा वाटू नये ; सदाभाऊ खोतांचा भाजपला खोचक सवाल
Sadabhau Khot on Ajit Pawar : शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवार गट आल्याने शिंदे गटातील आमदार नाराज आहेत. त्याचबरोबर भाजपबरोबर असलेले घटक पक्षही आपली नाराजी व्यक्त करत आहेत. नाशिकमध्ये रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आपले मत व्यक्त केले केले.( sadabhau khot on ajit pawar and bjp)
अजित पवारांना सत्तेत घेतल्याबाबत सदाभाऊ खोत म्हणाले, आमची महायुती झाली आहे. आणखी पक्ष येण्याच्या वाटेवर आहेत. त्यांना सामावून घेण्याच्या उद्देशाने महायुतीचे नाव ठेवण्यात आलेले आहेत. आता नव्याने राष्ट्रवादी पक्ष महायुती जोडली गेली आहे. त्याचे स्वागत करतो. घटक पक्ष २०२४ पासून भाजपबरोबर आहे. परंतु त्यांना कुठे तरी सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. जावई आत येत असताना घरच्यांना परकेपणा वाटू नये ही दक्षता भाजपने घ्यावी, असा सवालही सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.
सरदार सैरभैर झालेत, तर सेनापती दाही दिशा पळतोय; शरद पवारांना सदाभाऊंनी डिवचले
घटकपक्षाची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर झालेली आहे. त्यात शेतकऱ्यांसह अनेक मुद्दांवर चर्चा झालेली आहे. आतापर्यंत भाजपने सत्तेमध्ये घटक पक्षांना सामावून घेतले आहे. महादेव जानकर यांना मंत्रिपद दिले आहे. रामदास आठवले यांना राज्यसभेवर घेऊन मंत्रिपद दिले आहे. भाजपने घटक पक्षाला काहीना काही दिलेले आहे हे नाकारून चालणार असेही खोत म्हणाले.
शिंदे-फडणवीस राजभवनाकडे गेले आणि अनेकांना धडकी भरली !
भविष्यकाळात सरकार स्थिर झाल्यानंतर घटक पक्षाच्या भूमिकेवर चंद्रशेखर बावनकुळे हे निर्णय घेणार आहेत. त्या पातळीवर चर्चा झालेली आहे. दर महिन्याला घटक पक्षाची बैठका घेतल्या जाणार आहेत. असेही खोत यांनी स्पष्ट केले आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. यशवंतराव चव्हाणांच्या पायाचे दर्शन घ्यायला ते जातात. पण, ज्या यशवंतराव चव्हाणांनी गाव-गाड्यापासून, राजकारण, समाजकारणाचा पाया रचला, तो पायाच उध्दवस्त करण्याचे पाप शरद पवारांनी केल्याची टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
https://www.youtube.com/watch?v=oHw_VyZOIFI