सरदार सैरभैर झालेत, तर सेनापती दाही दिशा पळतोय; शरद पवारांना सदाभाऊंनी डिवचले
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांनी गवताची जी पेंडी बांधली होती, ती पेंडीचं आता मोडली. गवताच्या पेंडीच्या काड्या काड्या झाल्या. बारामतीचा अंमल संपल्यानं सरदार सैरभैर झालेत, तर सेनापती दाही दिशा पळायला लागला. यशवंतराव चव्हाणांच्या (Yashwantrao Chavan) पायाचं दर्शन घ्यायला जातात. पण, ज्या यशवंतराव चव्हाणांनी गाव-गाड्यापासून, राजकारण, समाजकारणाचा पाया रचला, तो पायाच उध्दवस्त करण्याचं पाप शरद पवारांनी (Sharad Pawar) केल्याची जळजळीत टीका रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली. (Sadabhau Khot on sharad pawar they said Sharad Pawar did the work of destroying Yashwantrao Chavans foundation)
रविवारी अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन राष्ट्रवादीत बंड केलं आणि शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली. या शपथविधीनंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकत शरद पवारांना निवृत्त व्हयाला सांगितलं. याविषयी आज एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, गवताची पेंडी जी बांधली होती, ती आता मोडली. गवताच्या पेंडीच्या काड्या काड्या झाल्या. 60 वर्षात राज्यात कुणाचंही सरकार येवो, राज्यात अंमल मात्र हा बारामतीचाच चालायचा. आता हाच बारामतीचा अंमल देवेंद्र फडणवीसांनी रोखल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले.
फडणवीसांनी बारामतीच्या राष्ट्रवादीचा रथ रोखल्याने राष्ट्रवादीचे सगळे सरदार सैरभैर झालेत, तर त्यांचा सेनापती दाही दिशा पळायला लागला आहे. यशवंतराव चव्हाणांच्या पायाचं दर्शन घ्यायला शरद पवार जातात, पण, ज्या यशवंतराव चव्हाणांनी गाव गाड्यापासून, राजकारण, समाजकारणाचा पाया रचला, तो पायाच उध्वस्त करण्यचा काम पवारानी केल्याचं विखारी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
दिलीपराव सत्तेसाठी हपापलेले नाहीत, वळसे पाटलांच्या बचावासाठी जुना मित्र आला धावून
ते म्हणाले, आता हेच शरद पवार म्हणतात, की माझं उद्धस्त झालेलं घर नव्यानं उभं करेल. पण, तुम्ही अनेकांची घरं उद्धस्त केली. या राज्यातील शेतकरी तुमच्या धोरणांमुळे आत्महत्या करायला लागला. सहकार चळवळ तुम्ही आणि तुमच्या चेल्यांनी मोडून काढली. त्यावेळी का तुम्हाला गावगाड्यातील शेतकरी दिसला नाही? असा सवाल खोत यांनी केला.
गोर-गरीब जनतेची घरं उध्वस्त करून तुम्ही तुमच्या माड्या बांधल्या. आता तुमची माडी मोडली, तर जनतेला का वाईट वाटावं? आता आमहाला मजा येते. जे पेराल, ते याच जन्मात फेडावं लागतं, असं म्हणत, शरद पवार या शेतकरी विरोधी व्यक्तीला रोखण हेच आता शेतकऱ्याच काम आहे, पवारांना आता गावगाड्यात येऊ देऊ नका, असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलं.
दरम्यान, राष्ट्रवादीतील बंडानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. खुद्द अजित पवारांनीही शरद पवारांवर टीका केली. निवृत्त व्हा, असा सल्लाही त्यांनी शऱद पवारांना दिला. मात्र, शरद पवार हेच आमचे मार्गदर्शक आहेत, असं अजित पवार म्हणाले होते. मात्र, सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर कुठलीही तमा न बाळगता थेट वार केला. पवारांना शेतकरी विरोधी म्हणतं त्यांनी गोरगरीबांची घरं उद्ध्वस्त केल्याची टीका खोत यांनी केली. या टीकेला आता राष्ट्रवादी कॉंग्रेस काय प्रत्युत्तर देते, हेच पाहणं महत्वाचं आहे.