Harshvardhan Sapkal On Devendra Fadnavis : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज माध्यमांशी बोलताना ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलताना यांनी त्याच समकक्ष काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे असं वक्तव्य केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचे काम त्यांनी केलंय. हे अतिशय निंदनीय आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे. सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर केल्यानंतर आता सपकाळ यांनी देखील फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ज्या संघ भाजपाच्या विचारातून येतात त्या विचारांचे लोक इंग्रजाची गुलामी आणि हेरगिरी करत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला इतिहास शिकविण्याच्या भानगडीत पडू नये असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत होते. ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी देवेंद्र… pic.twitter.com/xb4MnsBGHe
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) February 14, 2026
हर्षवर्धन सपकाळ या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान (Tipu Sultan) पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत होते. ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस ज्या संघ भाजपाच्या विचारातून येतात त्या विचारांचे लोक इंग्रजाची गुलामी आणि हेरगिरी करत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला इतिहास शिकविण्याच्या भानगडीत पडू नये. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप आणि आरएसएसच्या भगतसिंह कोश्यारी सह कुणी-कुणी काय-काय मुक्ताफळे उधळली आणि अवमान केलाय हे महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही असं या पोस्टमध्ये हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
ओमानला डबल धक्का, आयर्लंडकडून 96 धावांनी पराभव अन् विश्वचषकातून OUT
नेमकं काय म्हणाले होते हर्षवर्धन सपकाळ?
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचं शौर्य ज्याप्रकारचं आहे, त्यांनी जो स्वराज्याचा विचार दिला, त्याच मांदियाळीत, त्यांच्यानंतर बऱ्याच वर्षांनी टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्याविरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे र्शोर्य गाजवणारे युद्ध होऊ गेले, भारताचे भूमिपूत्र होऊन गेले, त्यांनी कधीही कोणत्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. त्यामुळे शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांच्याकडे शिवाजी महाराजांच्य समकक्ष पाहिले पाहिजे.
