Download App

Hasan Mushrif यांच्या अडचणी वाढणार ? मुलांच्या अटकपूर्व जामिनाला ईडीचा विरोध ! 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ३५ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money laundering case) गुन्हा दाखल करण्यात आल्यावर त्यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. ईडीकडून हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनाला विरोध करण्यात आला आहे. यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हसन मुश्रीफ यांच्या नाविद, आबिद आणि साजिद मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयातील (Bombay Sessions Court) विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जात राजकीय हेतूनं अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. ईडीने तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनाला विरोध करताना सांगितले की, त्यांनी चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलं नाही. त्यांना चौकशीकरिता समन्स बजावून देखील ते हजर झाले नाहीत. जामीन दिल्याने चौकशीवर परिणाम होणार असल्याचे ईडीने सांगितलं आहे.

ईडीची भूमिका काय ?

हसन मुश्रीफ यांची मुलं सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात संचालक आणि भागधारक आहेत. प्राथमिक चौकशीमध्ये कारखान्याला मोठ्या प्रमाणात पैसा आला आहे आणि या पैशाच्या संदर्भात कोणतीही समाधानकारक माहिती दिली नाही. हा पैसा अवैध मार्गाने आले असल्याचा दावा ईडीने केला आहे. दरम्यान, हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांकडून वरिष्ठ वकील आबाद पोंडा आणि प्रशांत पाटील यांनी सत्र न्यायालयात आपली बाजू मांडली. ईडीकडून हसन मुश्रीफ यांना टार्गेट करण्याचा मुख्य हेतू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यांच्याविरोधात कोणतेही गैरव्यवहार केल्याचे समोर आले नसल्याचे सांगितले जात आहे. ईडीने हे आरोप फेटाळून लावताना न्यायालयात दिशाभूल केली जात असल्याचे सांगितले. छापेमारी कायदेशीर मार्गाने झाल्याचे ईडीने यावेळी सांगितले.

Devendra Fadnavis च्या गौप्यस्फोटावर अजित पवार संतापले, ‘पुन्हा पुन्हा तेच…’

मुश्रीफांवर २१ दिवसांत दोनदा छापेमारी

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणी ११ जानेवारी दिवशी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. या ३ ठिकाणांसह मुश्रीफ यांच्या कन्येच्या कोल्हापुरातील सासने मैदान परिसरातील घरावर देखील छापा टाकण्यात आला. ११ जानेवारी दिवशी ईडीकडून पुण्यात मुश्रीफ यांच्याशी संबंधित ४ ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअर समोर पेट्रोल पंपामागे इमारतीमधील कार्यालय, हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक, तसेच साऊथ मेन रोड-कोरेगाव पार्कमध्ये राहणारे व्यावसायिक भागीदार यांच्यावर छापेमारीची कारवाई करण्यात आली होती.

Tags

follow us