Kasba-Chinchwad Bypoll : मविआकडून आरपारची लढाई; खुद्द शरद पवार उतरणार मैदानात

Kasba-Chinchwad Bypoll : मविआकडून आरपारची लढाई; खुद्द शरद पवार उतरणार मैदानात

पुणे : कसबा पेठ (Kasba Bypoll) आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीकडून (MVA) आरपारची लढाई लढली जात आहे. दोन्ही पोटनिवडणुकीतील रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि विठ्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारात आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) खुद्द शरद पवार (Sharad Pawar) हे मैदानात उतरणार आहे. येत्या २२ फेब्रुवारीला प्रत्यक्ष प्रचारसभा तसेच बैठका घेणार आहेत.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विठ्ठल काटे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचाराचा धडाका आधीच सुरु झाला आहे. एकीकडे भाजपकडून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यातील महत्वाच्या नेते निवडणुकीच्या प्रचारात उतरवले जात आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही तोडीस तोड उत्तर देत खुद्द खरद पवार यांच्यसह इतर स्टार प्रचारक उतरवले जात आहेत. त्यामुळे आता प्रचारात उत्तरोत्तर रंगत वाढत चालली आहे.

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. तसेच प्रचार सभेत उतरण्याची विनंती केल्याची माहिती आहे. येत्या २२ फेब्रुवारीला प्रत्यक्ष प्रचारसभा तसेच बैठका घेणार आहेत. मात्र, प्रचार सभांची वेळ नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube