मराठा आरक्षणासाठी शेवटची ‘सर्वोच्च’ संधी : सुनावणी पूर्ण, निकालाची प्रतिक्षा, धाकधूक वाढली!

नवी दिल्ली : मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेविरुद्धची सुनावणी पूर्ण झाली असून याबाबतचा निकाल आज (6 डिसेंबर) संध्याकाळपर्यंत येऊ शकतो, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते. त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायायल नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे […]

State Backward Classes Commission Chairman and former Justice Anand Niragude is set to resign

Maratha Reservation

नवी दिल्ली : मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेविरुद्धची सुनावणी पूर्ण झाली असून याबाबतचा निकाल आज (6 डिसेंबर) संध्याकाळपर्यंत येऊ शकतो, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते. त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायायल नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (hearing against the curative petition filed by the state government against the decision to cancel the Maratha reservation has been completed)

अॅड. शिंदे म्हणाले, या याचिकेवरील सुनावणीवेळी पक्षकार किंवा वकील उपस्थित नसतात. लिखीत युक्तिवाद सादर केला जातो. त्यामुळे नेमका काय निकाल लागेल हे गुलदस्त्यातच आहे. आज संध्याकाळपर्यंत जो काही निकाल असेल तो समजेल. हा एकाच ओळीत असणार आहे. एक तर ही याचिका फेटाळली जाऊ शकते. दुसरी गोष्ट दोन्ही पक्षकारांना नोटीस काढली जाऊ शकेल किंवा खुल्या कोर्टात सुनावणीसाठी हे प्रकरण येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

Sanjay Shirsath : स्वाभिमान गाडला गेला, आता लोकांची पालखी वाहावी; शिंदेंच्या आमदाराचा ठाकरेंना टोला

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला आहे. त्याबाबतची पुनर्विचार याचिकाही फेटाळून लावण्यात आली आहे. यानंतर आता अंतिम उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची तरतुद आहे. मूळ निर्णयात आणि त्यानंतर पुनर्विचार याचिकेदरम्यान याचिकाकर्त्यावर मोठा अन्याय होत आहे, नैसर्गिक न्यायाचे पालन केले जात नाही तर अर्जदारास क्युरेटिव्ह याचिका दाखल करता येते. याच तरतुदीनुसार ही याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने ती स्वीकारली आहे.

शिक्षण खात्यातील काळा दिवस! तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्याकडे 5.85 कोटींचं घबाड; गुन्हा दाखल

मात्र याचिका दाखल करण्यापूर्वी दिलेल्या निकषांनुसारच क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली आहे, असे संबंधित ज्येष्ठ वकिलांनी न्यायालयाला प्रमाणित करुन देणे आवाश्यक असते. न्यायालयाला जर याचिका निकषाबाहेर किंवा समाधानकारक न वाटल्यास ती फेटाळण्याचा आणि याचिकाकर्त्यास दंड आकारण्याचा आदेश देता येतो. मात्र ही याचिका स्वीकारल्याने मराठा आरक्षणाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. आता यावर सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र कायदेशीर जाणकारांच्या मते, रेअरेस्ट रेअर क्युरेटिव्ह याचिकांमध्ये पुनर्विचार याचिकांमधील निकाल बदलला जातो. त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत नेमके काय होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version