Download App

सूर्य आग ओकतोय! विदर्भ, मराठवाडा-मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Heat Wave In Vidarbha Yellow Alert in Marathwada Madhya Maharashtra : राज्यात सध्या उष्णतेचा कहर आहे. याच पार्श्वभूमीवर विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा (Heat Wave In Vidarbha) आहे. तर मराठवाडा अन मध्य महाराष्ट्राला देखील येलो अलर्ट देण्यात आलाय. राज्यातील जनता वाढत्या उन्हाच्या कडाक्याने त्रस्त झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तापमानाचा (Maharashtra Temperature) पारा 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. तर ब्रम्हपुरीमध्ये उच्चांकी 45.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भ, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात देखील उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे.

या विभागांना हवामाने खात्याने येलो अलर्ट जारी केलाय. तसंच या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांत पावसाची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा (Maharashtra Weather Update) 42 अंशांच्या वर गेला आहे. वर्ध्यात 44 अंश, अकोला जिल्ह्यात 45 अंश, अमरावतीमध्ये 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय.

सरकारने फक्त राष्ट्रीय हिताचा विचार करावा; प्रचार करण्यात..पहलगाम हल्ल्यावरून ठाकरे गटाचा संपादकीयमधून सल्ला

विदर्भामध्ये पुढील 24 तास उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची शक्यता आहे. तापमान वाढत आहे, यातच पुढील दोन दिवसांमध्ये पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने व्यक्त केलीय. ‎सोलापूर, धुळे, जळगाव, जेऊर, मालेगाव, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यामध्ये 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला असून तापमान 43 अंश सेल्सियस दरम्यान असल्याची माहिती मिळतेय.

राज्यात वाढत्या तापमानाचा मानवी जनजीवनावर परिणाम होताना दिसतोय. दरम्यान उन्हामुळे त्वचा रोगाच्या रुग्णांची संख्या वाढली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे सनबर्नच्या रुग्ण संकेत सुद्धा वाढ झाली आहे. यामुळे गरज नसल्यास दुपारच्या उन्हात बाहेर जाण्याचे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जर शक्ती आहे तर ती अशावेळी दिसली पाहिजे…पहलगाम हल्ल्यानंतर मोहन भागवत काय म्हणाले?

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे कोकण अन् पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वाढलेली आहे. या हवामानाचा दैनंदिन जीवन, शेती आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची दाट शक्यता असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देखील देण्यात आलेला आहे. भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज यलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. ढगाळ हवामानासोबतच हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी, वादळी वारे अन् विजांचा कडकडाट होण्याची दाट शक्यता आहे.

 

follow us