Heat Wave : अवकाळीनंतर आता उष्णतेच्या लाटेचं संकट, कोकणाची चिंता वाढली
मुंबई : गेल्या काही दिवसात राज्याला अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) तडाखा बसला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालं. तर काही ठिकाणी गारपीठ देखील झाली. यामुळे राज्यात गारवा अनुभवायला मिळत होता. पण आता यामध्ये अवकाळीनंतर आता उष्णतेच्या लाटेचं संकट राज्यावर येऊ घातलं आहे. कारण राज्यात उष्णतेची लाट (Heat Wave) येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान (IMD) विभागाने दिला आहे.
कोकण आणि मुंबईमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढचे दोन दिवस तब्बल 39 अंशापर्यंत जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं अवाहन भारतीय हवामान विभागाने केलं आहे. दरम्यान राज्यात सध्या हवामान बदलामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. रूग्णालयांमध्ये सर्दी, ताप, खोकला असे लक्षण असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये आता उष्णतेच्या लाटेचं संकट निरमाण झाल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन केलं जात आहे.
अवकाळीनंतर राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, येणार उष्णतेची लाट
दुसरीकडे मात्र उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मात्र अवकाळी पावसाचे ढग कायम आहेत. या अगोदर देखील मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात अनेक ठिकणी अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) जोरदार गारपीठ झाली आहे. त्यामुळे राज्यात थंड वातावरण झाले होते. परंतु या अवकाळी नंतर राज्यात उन्हाचा चटका वाढणार वाढणार आहे.