Honor Killing In Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा ऑनर किलिंगची (Honor Killing) धक्कादायक घटना घडली आहे. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यामधील नाव्हा या गावात दुसऱ्या जातीच्या मुलासबोत प्रेम प्रकरण असल्याने पालकांनी 19 वर्षीय मुलीला ठार मारल्याची घटना समोर आली आहे.
प्रियकरासोबत प्रेम विवाह करण्याचा मुलीने हट्ट धरला होता मात्र मुलीच्या पालकांचा प्रेम विवाहाला विरोध होता मात्र तरी देखील तरुणी लग्न करण्यावर ठाम असल्याने पालकांनी तिची हत्या करून भावकीतील निवडक व्यक्तींनासोबत घेत मृतदेह जाळून पुरावा नष्ट केला. या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी आठ जणांवर खून, पुरावा नष्ट करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाव्हा गावातील 19 वर्षीय युवतीचे त्याच गावातील दुसऱ्या जातीतील युवकासोबत प्रेम संबंध होते. मात्र मुलीने आंतरजातीय विवाहाला पालकांनी विरोध केला मात्र तरीदेखील तरुणी लग्न करण्यावर ठाम असल्याने 21 एप्रिल 2024 च्या रात्री 10 च्या सुमारास तरुणीच्या आई वडीलांनी तरुणीला ठार करून त्याच रात्री कोणालाही थांगपत्ता लागू न देता भावकीतील निवडक व्यक्तीना सोबत घेऊन तरुणीचा मृतदेह नाव्हा येथील स्मशानभूमीत जाळून पुरावा नष्ट केला.
राम शिंदे – विखे मतभेदावर, महसुलमंत्र्यांची मोठी ग्वाही; म्हणाले, म्हसोबा महाराजांच्या साक्षीने …
या घटनेची माहिती मिळालेल्यानंतर पालम पोलीसात पोनि. रावसाहेब गाडेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत तरुणीचे आई, वडील आणि भावकीतील इतर सहा जणांवर खूनचा आणि इतर कलमात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील करीत आहे.