आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा मिळणार?
Govt schemes : राज्यातील अस्पृश्यता निवारण करण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साहाय्य म्हणून विवाह प्रोत्साहन योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत राज्य सरकार 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येते.(Govt schemes Intercaste Marriage Promotion Scheme)
पंतप्रधानांनी निषेधच नाहीतर कृती करावी, मणिपूर हिंसाचारावर राज ठाकरे संतापले…
आंतरजातीचय विवाह प्रोत्साहन योजनेचे लाभ काय?
या योजनेमध्ये लाभार्थ्याला राज्य सरकारकडून 50 हजार रुपये आणि डॉ.आंबेडकर फाऊंडेशनद्वारे अडीच लाख रुपये असे मिळून तीन लाख रुपये दिले जातात.
या योजनेची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे लाभार्थ्याकडे बँक खाते आणि ते आधार कार्डशी जोडलेले असणे गरजेचे आहे.
या योजनेत लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादाही रद्द करण्यात आली आहे.
सांगोल्यातील देशमुखांची भाऊबंदकी मिटली, पण फडणवीसांच्या एन्ट्रीने संभ्रम वाढला!
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय?
आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
विवाहित तरुणाचे वय 21 वर्ष आणि मुलीचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असावे.
विवाहित जोडप्यांपैकी कोणीही एकजण अनुसूचित जाती किंवा जमातीचे असणे आवश्यक आहे.
ही रक्कम त्या तरुण मुलांना किंवा मुलीला दिली जाईल ज्यांनी अनुसूचित जाती किंवा जमातीमधील मुलाशी किंवा मुलीशी लग्न केले आहे.
विवाहित जोडप्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रोत्साहन रक्कम मिळवण्यासाठी कोर्ट मॅरेज करणे बंधनकारक आहे.
अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधील व्यक्तीने मागासवर्गीय किंवा सामान्य प्रवर्गातील तरुण किंवा तरुणीशी लग्न केले तरच ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजनेचा लाभ कोणाला घेता येईल?
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व्यक्तींपैकी एक व्यक्ती दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदुलिंगायत, जैन, शीख यांच्यातील असतील तर आंतरजातीय विवाह संबोधण्यात येतो. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमातील यामधील आंतर प्रवर्गातली विवाहास आंतरजातीय विवाह म्हटले जाईल.
आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड
पासपोर्ट आकार फोटो
कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट (विवाह नोंदणी दाखला)
वधु-वराचे शाळा सोडल्याचे दाखले.
दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारसपत्रे
वधु-वराचे एकत्रित फोटो
बँक खाते पासबुक
जात प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
अर्ज कसा करावा?
आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडून घेऊन विवाहित दाम्पत्याने अर्जात नमूद कागदपत्रांच्या मूळ व प्रमाणित प्रतिसह अर्ज सादर करावा.
अधिक माहितीसाठी संपर्क या ठिकाणी संपर्क साधा :
जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद/ मुंबइ शहर व उपनगरासाठी समाज कल्याण अधिकारी, बृहन्मुंबई, चेंबूर येथे किंवा समाज कल्याण महाराष्ट्रच्या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधू शकता.