आरक्षणासाठी प्रयत्न करणारे फडणवीस वाईट कसे? चंद्रकांत पाटलांचा जरांगेंवर हल्लाबोल

Chandrakant Patil On Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणावर बसले आहे. पाटील यांच्या

Chandrakant Patil On Manoj Jarange

Chandrakant Patil On Manoj Jarange

Chandrakant Patil On Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणावर बसले आहे. पाटील यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस असून जेव्हा पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तेव्हा पर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. तसेच माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहे.

जरांगे पाटली 29 ऑगस्टपासून अंतरवली सराटीत उपोषण करत असून 15 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) उपोषण करण्यासाठी निघाले आहेत. सध्या पाटील बीड जिल्ह्यातील पाटोद्यात मुक्कामासाठी थांबले आहे. मात्र काल रात्री त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तात्काळ आयसीयूमध्ये दाखल करण्याची सूचना डॉक्टारांनी दिली आहे. तर दुसरीकडे आता भाजप नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आरक्षण न देणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे चांगले तर आरक्षणासाठी प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे वाईट कसे असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारले आहे.

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, आरक्षण न देणारे शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चांगले तर आरक्षणासाठी प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वाईट कसे? असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तर मराठा समाजाचं हित पाहून जरांगे पाटील यांनी आंदोलन करावं आणि त्यात राजकारण आणू नये असं आवाहन देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करु नये – राधाकृष्ण विखे पाटील

मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करु नये. त्यांनी गणोशोत्सव संपल्यानंतर उपोषण करावे असल्याची प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. तसेच उपोषण न करण्याची विनंती त्यांनी जरांगे पाटील यांना केली आहे.

Manoj Jarange Health : मनोज जरांगेंची तब्येत खालावली; ICU मध्ये दाखल करण्याची डॉक्टारांची सूचना

तर दुसरीकडे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांदा मुंबई पोलिसांकडे अर्ज केला आहे. यावर आता मुंबई पोलिसांकडून जरांगे पाटलांना एक महत्त्वाचे पत्र देण्यात आले आहे. अर्जाचा अवलोकन केले असता जरंगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये आणि त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये विरोधाभास दिसून येत असल्याचे मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. यापूर्वी दोनदा जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर  आंदोलनासाठी परवानगी मागण्यासाठी अर्ज केला होता मात्र मुंबई पोलिसांनी परवानगी दिली नव्हती.

Exit mobile version