शिक्षण ही भविष्यातील संपत्ती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांच्या यशाचा, मेहनतीचा आणि शैक्षणिक प्रवासाचा गौरव करणारा हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

  • Written By: Published:
Untitled Design 23 1

Statement by Minister Chandrakant Patil : शिक्षण ही भविष्यातील संपत्ती आहे. भारत आणि महाराष्ट्र शासन संशोधन व नवोपक्रम आधारित शिक्षणावर भर देत असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. 2047 पर्यंत भारत आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या जगात अग्रक्रमावर असेल, असा विश्वास आहे. विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे. संस्थेची प्रगती आणि गुणवत्ता लक्षात घेता भविष्यात तिला खासगी विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासाठी शासन सकारात्मक विचार करीत आहे. आवश्यक शैक्षणिक निकष, अधोसंरचना आणि गुणवत्ता मानकांची पूर्तता झाल्यानंतर आयएसबीएमला विद्यापीठाचा दर्जा देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया पुणे येथे 2026 सालचा 25 वा रौप्यमहोत्सवी निमित्त आयोजित दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी 2023-2025 या बॅचमधील सुमारे 300 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या यशाचा, मेहनतीचा आणि शैक्षणिक प्रवासाचा गौरव करणारा हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद कुमार, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, तसेच इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अतुल खराटे उपस्थित होते. मुळशी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या संस्थापक डॉ. सरोजा अस्थाना पीईजी चे विश्वस्त डॉ. भीष्मराज श्रीवास्तव आणि डॉ. मनोज शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

इराण-इस्रायल संघर्षाची झळ भारतीय शेअर बाजाराला; सेन्सेक्स 821 अंकांनी कोसळला, निफ्टीतही मोठी घसरण

डॉ. प्रमोद कुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. भारत हा संधींचा देश असून विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळावे. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, हा स्वामी विवेकानंदांचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. जागतिक स्तरावर अस्थिरता असतानाही भारताची आर्थिक प्रगती मजबूत आहे. भारतीय युवकांमध्ये नवकल्पना, उद्योजकता आणि जागतिक नेतृत्व करण्याची क्षमता आहे.

समारंभादरम्यान विविध विद्यार्थ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. संभवी स्वाईम हिला आयएसबीएम नांदे टॉप परफॉर्मर पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर जया सैनी हिला आयएसबीएम नांदे ऑल राऊंडर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिराज सिंह राठोड यांना आयएसबीएम नांदे लीडरशिप पुरस्कार प्रदान करण्यात आला. साकिरा सिन्हा हिला आयएसबीएम कोलकाता बेस्ट अकॅडमिक परफॉर्मर पुरस्कार मिळाला, तर अनुश्या घोष हिला कोलकाता बेस्ट ऑल राऊंडर पुरस्काराने गौरविण्यात आले.

गौरव क्षीरसागर यांना एमआयबीएम ऑल राऊंडर बॉईज पुरस्कार मिळाला, तर लीना पाल हिला एमआयबीएम ऑल राऊंडर गर्ल्स पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सच्चितानंदराज रेड्डी, दीपल लखोटिया, आश्वानी राजेसिंग यांनी केले. अर्पिता रॉय यांनी आभार व्यक्त केले.

follow us