Download App

31st Party : दारु पिऊन गाडी चालवणार? ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये सापडलात तर दंड, जेल किंवा दोन्हीही शक्य

पुणे : जगभरात नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते. या पार्टींमध्ये अनेकदा मद्यपान केले जाते. त्यानंतर घरी परतताना बहुतांश जण स्वतः गाडी चालवतात. पण यातून ड्रिंक अँड ड्राइव्ह (Drink and Drive) नियमांचे उल्लंघन केले जाते. भारतात दारु पिऊन गाडी चालवणे गुन्हा आहे. यामुळे दंड आणि शिक्षा दोन्हीला सामोरे जावे लागू शकते.

या पार्श्वभूमीवर दारू प्यायल्यानंतर गाडी चालवताना पकडले तर किती दंड भरावा लागतो? ड्रिंक अँड ड्राइव्हचे काय नियम आहेत, जाणून घ्या. (How much fine to pay if caught driving after drinking? What are the rules of drink and drive?)

ड्रिंक अँड ड्राइव्ह ‘गुन्हा’ :

वाहन अधिनियम 2019 च्या कलम १८५ नुसार, भारतात मद्य पिऊन गाडी चालवणे गुन्हा

एखादी बाइक किंवा वाहन चालवताना चालकाच्या रक्तात 30 मिलीग्रॅमपेक्षा जास्त अल्कोहल मिळाल्यास ते ड्रिंक ड्राइव्हच्या श्रेणीत.

अल्कोहलची मात्रा निश्चिती घटनास्थळी ब्रीथ अॅनालायजर टेस्टने होऊ शकते.

ड्रिंक अँड ड्राइव्हवर किती दंड किंवा शिक्षा असेल?

ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणात प्रथम सापडल्यानंतर 10 हजार रुपये दंड किंवा सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास, किंवा शिक्षा आणि दंड दोन्ही.

दुसऱ्यांदा सापडल्यास 15 हजार रुपये दंड किंवा दोन वर्षांची शिक्षा, किंवा शिक्षा आणि दंड दोन्ही.

ड्रिंक अँड ड्राइव्हचा गुन्हा जामीनपात्र

वारंवार उल्लंघन करणाऱ्यांचा वाहन परवानाही रद्द होऊ शकतो.

कारवाई करताना पोलिसांसोबत वाद घातल्यास शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही दाखल होतो.

‘गुजरातला जाणारे प्रकल्प रोखण्याची हिंमत राणेंमध्ये नाही’; ‘पाणबुडी’ प्रकल्पात राऊतांची ठिणगी

दंड न भरल्यास काय?

दंड न भरल्यास आरोपीला अटक केली जाते. त्याला 24 तासांच्या आत प्रथम वर्ग न्यायाधीशासमोर हजर करण्याचे बंधन.

तिथे न्यायालय जी शिक्षा देईल ती मान्य करावी लागते.

वाहनही कोर्टात दंड भरुन सोडवले जाऊ शकते.

Lok Sabha 2024 : तनपुरे लागले तयारीला.. सुजय विखेंना मिळणार तगडी फाईट?

‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’पासून वाचण्याच्या काही आयडिया

मद्यपान न करणाऱ्या व्यक्तीला गाडी चालविण्यासाठी सोबत घेणे.

मद्यपान केल्यानंतर कॅब करुन, रिक्षा करुन घरी जाणे.

काही शहरांमध्ये बार चालकांना मद्यपान केलेल्या व्यक्तींना घरी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

follow us