Download App

… तर सुरेश धस 75 हजारांच्या लीडने निवडून आले असते का? पंकजा मुंडेंचा सवाल

Pankaja Munde On Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) बीडचं राजकारण चांगलंच

  • Written By: Last Updated:

Pankaja Munde On Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) बीडचं राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर टीका करताना दिसत आहे. तर आता पंकजा मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ते माझ नाव घेऊन जी चर्चा करतायत, त्यावर मी माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. ज्या विषयाशी कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं, टिप्पणी करणं त्यांच्याकडून अपेक्षित नाही. पक्षाच्या भूमिकेला ठेच पोहूच नये, म्हणून मी चार-पाच महिने गप्प बसले, पण आता पक्षश्रेष्ठींना विनंती केलीय की, त्यांना समज द्यावी. असं माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या.

सुरेश धस 75 हजार मतांनी निवडून आले

विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी पक्षाच्या विरोधात काम केला असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. या आरोपावर देखील पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या आरोपावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी विधानसभा निवडणुकीत सुरेश धस यांचा प्रचार केला की नाही हे रेकॉर्ड तपासा. मी व्यासपीठावर जाऊन सुरेश धस यांना मतदान करण्याची विनंती केली होती आणि जर सुरेश धस यांना आक्षेप होता तर त्यांनी प्रचार सुरु होता तेव्हा आरोप करायला पाहिजे होता पण प्रचारात ते माझ्या शिवाय कोणाचंही नाव घेत नव्हते.

प्रेमाचा गोडवा आणखी वाढणार , ‘गुलकंद’ मधील ‘चंचल’ प्रेमगीत रिलीज

सुरेश धस हे 75 हजार मतांनी निवडून आले. मी प्रचार केला नसता तर हे शक्य झालं असतं का? याउलट लोकसभेत मला गेल्यावेळी जितका लीड होता. तो आता आर्धा झाला आहे. अनेक लोकांनी मला मदत केली नाही, पण मी तो विषय मागे सोडला कारण जाहीरपणे याबाबत बोलणे पक्षाच्या शिस्तीला धरुन नाही. 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यापासून मी याबाबत बोलणे टाळत होते. असं देखील माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या.

follow us