पीओपी मूर्तीबाबत शास्त्रज्ञ पुरावे देणार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं राज्य मूर्तिकार संघटनांना आश्वासन

Pankaja Munde On POP Idols : पीओपी गणेशमूर्ती उद्योगावर आधारित असलेला रोजगार सरकारने वाचावा अशी मागणी राज्य मूर्तिकार संघटना आणि गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात येत आहे. तसेच मंगळवारी परळ येथे झालेल्या पीओपी मूर्तिकारांच्या संमेलनात पीओपी मूर्ती पर्यावरण पूरकच आहेत असा दावा देखील केला आहे. यावर आता माध्यमांशी बोलताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या की, मी मंत्री झाल्यानंतर लगेच 15-20 दिवसांच्या आता सयाद्री येथे पीओपी संदर्भात बैठक घेतली होती. आता देखील काही आमदार आणि मंत्री आदित्य तटकरे यांच्या मागणीनुसार मी विधीमंडळात सुद्धा बैठक घेतली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड आहे त्यांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे पीओपी मूर्ती तयार करण्यास बंदी आहे. याबाबत नागपूर (Nagpur) व मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Courts) विषय झाला आहे. न्यायालयाने सू मोटो (Su moto) विषय घेतला असून मार्गदर्शक सुचनांवरुन कारवाई करा असा आदेश दिला आहे. अशी माहिती पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, आदिती तटकरे व इतर आमदारांना घेऊन मी बैठक घेतली आहे. या बैठकीत काही लोकांनी असं सांगितलं की, पीओपी कसा हानिकारक नाही आहे. त्यावर मी त्यांना सांगितलं की, तांत्रिक पुरावा द्या, पुरावे आम्ही केंद्रीय बोर्डाला देऊ असेही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच महाराष्ट्रात गणेशोत्सवात मूर्ती वापरतो या मूर्तींचा आर्टिफिशियल कुंडात विसर्जन केले तर नुकसान होत नाही मात्र नदीत, समुद्रात केलं तर प्रदूषण होते त्यामुळे या मूर्त्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. असं देखील यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.
मोठी बातमी! पोर्तुगालमध्ये सरकार कोसळले, पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो यांनी दिला राजीनामा
आज या मूर्तींवर एक मोठा उद्योग आहे पण प्रदूषण देखील महत्वाचा विषय आहे आणि आमच्यासाठी कोर्टाचे निर्देश श्रेष्ठ व क्रमप्राप्त आहेत. आम्ही याबाबत शास्त्रज्ञ पुरावे आणणार आहेत आणि त्यानुसार पीओपीसाठी परवानगी मागू असं माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भेट घेतली. त्यांच्याकडे काही पर्यावरणाचे मुद्दे होते. त्याबाबत आम्ही चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.