HSC result 2025: बारावीचा निकाल, विभागनिहाय निकालात कोण आघाडीवर? वाचा एका क्लिकवर…

HSC result 2025 Region Wise Result Statistics : बारावीच्या विद्यार्थ्यांची आज प्रतिक्षा (HSC result 2025) संपली आहे. आज बारावीचा निकाल जाहीर झालाय. महाराष्ट्र बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला असून विभागनिहाय निकाल (HSC result) काय आहे, ते आपण जाणून घेऊ या. महाराष्ट्र बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन परिक्षेचा निकाल जाहीर केलाय. दुपारी 1 वाजता वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाला […]

HSC Result 2025

HSC Result 2025

HSC result 2025 Region Wise Result Statistics : बारावीच्या विद्यार्थ्यांची आज प्रतिक्षा (HSC result 2025) संपली आहे. आज बारावीचा निकाल जाहीर झालाय. महाराष्ट्र बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला असून विभागनिहाय निकाल (HSC result) काय आहे, ते आपण जाणून घेऊ या.

महाराष्ट्र बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन परिक्षेचा निकाल जाहीर केलाय. दुपारी 1 वाजता वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाला पाहता येणार आहेत. सध्या पत्रकार परिषदेमध्ये बोर्डाकडून विभागनिहाय आकडेवारी जाहीर देखील करण्यात आली आहे.

मोठी बातमी! इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर; ९१.८८ टक्के उत्तीर्ण, लातूर पॅटर्नचा वाजला बोऱ्या

विभागनिहाय निकाल काय? 

पुणे – 91.32%

नागपूर – 90.52%

संभाजीनगर – 92.24%

मुंबई – 92.93%

कोल्हापूर – 93.64%

अमरावती – 91.43%

नाशिक – 91.31%

लातूर – 89.46%

कोकण – 96.74%

खळबळजनक! 20 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी आमदाराला एसीबीने ठोकल्या बेड्या

बारावी परीक्षेत मुलींनी मारली बाजी

बारावी परीक्षेत मुलींनी बाजी मारल्याचं समोर आलंय. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 94. 58% आहे. तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51. यावरून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07 टक्क्यांनी जास्त आहेत.

यंदा बारावीच्या निकालाचा टक्का घसरला

यंदा बारावीच्या निकालाचा टक्का घसरला असल्याचं दिसतंय. फेब्रुवारी मार्च 2024 बारावी परिक्षेचा निकाल 93.37 टक्के होता. तर फेब्रुवारी-मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के
आहे. यंदा निकालाचा टक्का 1.49 ने कमी झालाय.

यंदा बारावीचा निकाल 91.88 टक्के

यंदा बारावीचा निकाल 91.88 टक्के लागला आहे. राज्यातील मुलींचा निकाल 94.58 टक्के तर मुलांचा निकाल 89.51 टक्के लागला आहे. विज्ञान विभागाचा निकाल 97.35 टक्के, कला विभागाचा निकाल 80.52 टक्के तर वाणिज्य विभागाचा निकाल 92.68 लागला आहे. व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल 83.03 टक्के तर आयटीआयचा निकाल 82.03 टक्के लागला आहे.

अखेर विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपलेली आहे. इयत्ता 12 वी महाराष्ट्र बोर्डचा निकाल जाहीर दुपारी एक वाजता होणार आहे. तरी तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मंडळाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. त्यामध्ये परिक्षार्थींसह उत्तीर्ण झालेल्यांची आकडेवारी सांगण्यात आली आहे.  दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

 

Exit mobile version