HSC Result 2023 : कोकण विभागचं पुन्हा ‘किंग’; बारावीच्या निकालावर मुलींचाच दबदबा

  • Written By: Published:
HSC Result 2023 : कोकण विभागचं पुन्हा ‘किंग’; बारावीच्या निकालावर मुलींचाच दबदबा

HSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला आहे.  तर विभागनिहाय निकालात यंदा देखील कोकण विभागानेच बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला आहे,. तर 88.13 टक्क्यांसह मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी लागला आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विभागनिहाय निकाल : 

पुणे: 93.34 टक्के, नागपूर: 90.35 टक्के, छत्रपती संभाजीनगर: 91.85 टक्के, मुंबई: 88.13 टक्के, कोल्हापूर: 93.28 टक्के, अमरावती: 92.75 टक्के, नाशिक: 91.66 टक्के, लातूर: 90.37 टक्के, कोकण: 96.01 टक्के असा विभागनिहाय निकाल जाहीर लागला आहे.

12 लाख विद्यार्थी उत्तीर्ण :

यंदा बारावीच्या परीक्षेला 9 विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय शिक्षण या शाखांतील एकूण 14 लाख  16 हजार 371 नियमित विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. यापैकी 12 लाख 92 हजार 468 अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून.

यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली :

यंदाही दरवर्षीप्रमाणे बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा एकूण निकाल 93.73 टक्के लागला आहे. तर मुलांचा 89.14 टक्के निकाल लागला आहे.

शाखानिहाय निकाल :

विज्ञान शाखेचा निकाल 96.09 टक्के, कला शाखेचा निकाल 84.05 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 90.42 टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा निकाल 89.25 टक्के लागला आहे.

बारावीच्या निकालातील महत्वाच्या गोष्टी :

  • यंदाचा बारावीचा राज्याच्या निकाल 91.25 टक्के
  • 154 विषयांपैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के
  • मुलींचा निकाल 93. 73 टक्के तर मुलांचा निकाल 89.14 टक्के
  • 96.01 टक्क्यांसह कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक
  • 88.13 टक्क्यांसह मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी

सविस्तर निकाल कुठे पहाल?

दरम्यान, दुपारी 2 वाजता निकाल सविस्तर निकाल जाहीर होणार असून तो ऑनलाईन पाहता येणार आहे. खालील वेबसाईटवर हा ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

https://hscresult.mkcl.org/

https://hsc.mahresults.org.in

www.mahresult.nic.in

5 जूनला मिळणार मार्कशिट :

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी 26 मे पासून 5 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उत्तरपत्रिकेच्या प्रतीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 14 जून आहे. तर विद्यार्थ्यांना 5 जूननंतर महाविद्यालयांमध्ये Marksheet मिळणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube