खळबळजनक! 20 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी आमदाराला एसीबीने ठोकल्या बेड्या

ACB Arrests MLA Jaikrishn Patel In Corruption Case Taking Bribe : विधानसभेतले प्रश्न हटवण्यासाठी आमदार साहेबांनी लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार (Rajsthan Crime) समोर आलाय. तब्बल अडीच कोटींवर तडतोड केल्याची माहिती मिळतेय. ही घटना राजस्थानमध्ये घडली आहे. एसीबीने राजकुमार रोट यांच्या भारत आदिवासी पक्षाचे (BAP) आमदार जयकृष्ण पटेल यांच्यावर (Jaikrishn Patel) आपली पकड घट्ट केलीय. 20 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एसीबी म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जयकृष्ण पटेल यांना अटक केली. विधानसभेत तीन प्रश्न (Corruption Case) सोडण्यासाठी बीएपी आमदाराने 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला जात आहे.
38 वर्षीय जयकृष्ण पटेल राजस्थानातील बांसवाडा जिल्ह्यातील बागिदोरा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. लोकसभेसोबत झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. राजस्थानच्या इतिहासात भ्रष्टाचाराच्या (Bribe) आरोपाखाली एसीबीने आमदाराला अटक केल्याची ही पहिलीच घटना आहे. एसीबीचे महासंचालक रवी प्रकाश मेहरदा यांनी ही माहिती दिली आहे.
Video : पहलगामच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्याची आत्महत्या; व्हिडिओ होतोय व्हायरल
पीटीआयच्या वृत्तानुसार, जयकृष्ण पटेल यांनी विधानसभेत खाणींवर प्रश्न उपस्थित न करण्यासाठी 10 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. असा दावा केला जातोय की, ही डील अडीच कोटी रुपयांना फायनल झाली. तक्रारदाराने प्रथम आमदाराला 1 लाख रुपये दिले. यानंतर, आमदार निवासस्थानी 20 लाख रुपये घेताना एसीबीने त्याला पकडले. एसीबीचे म्हणणे आहे की, आमदाराने 20 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग एका माणसाला दिली होती, जो ती घेऊन पळून गेला. आता एसीबीचे अधिकारी आमदाराची चौकशी करून त्या माणसाला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार; दुपारी १ वाजता निकाल, ‘या’ संकेस्थळावर पाहा
एसीबी डीजीचा दावा आहे की, आमदार जयकृष्ण पटेल यांच्याविरुद्ध ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही पुरावे आहेत, ते त्यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत. राजकुमार रौत म्हणाले की, जर आरोप सिद्ध झाले तर पक्ष आमदार जयकृष्ण पटेल यांच्यावर कारवाई करेल. सध्या तरी याबद्दल काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. हे भाजप सरकारचे षड्यंत्र असण्याचीही शक्यता आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. जयकृष्ण पटेल यांची भ्रष्टाचार प्रकरणात काही भूमिका आहे की नाही, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. यानंतर पक्ष योग्य ती कारवाई करेल.
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटलंय की, कोणीही कायद्यापेक्षा मोठे नाही. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करत आहे.ईडी, आयटी आणि सीबीआयला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे.