भाजपचा आणखी एक मास्टर स्ट्रोक; निवडणूक रिंगणात असतानाच एकाला मंत्रिपदाची लॉटरी

  • Written By: Published:
भाजपचा आणखी एक मास्टर स्ट्रोक; निवडणूक रिंगणात असतानाच एकाला मंत्रिपदाची लॉटरी

Rajasthan Cabinet Expansion : जयपूर : राजस्थानमध्ये भाजपने (BJP) काँग्रेसकडून (Congress) सत्ता हिसकाविल्यानंतर मुख्यमंत्री निवडणे, मंत्रिमंडळ विस्तारात अनेक धक्कातंत्राचा वापर केला आहे. आता तर मंत्रिमंडळात एकाला निवडणुकीपूर्वीच मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. बावीस जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात अद्याप आमदार न झालेल्या सुरेंद्रपाल सिंह टीटा (Surendrapal Singh) यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. राजस्थानमध्ये एका जागेसाठी 5 जानेवारीला मतदान होत आहे. करणपूर विधानसभेसाठी भाजपकडून सुरेंद्रपाल सिंह टीटा हे मैदानात आहेत. ते विजयी होतील असा भाजप शंभर टक्के विश्वास आहे. त्यामुळे त्यांना आताच मंत्रिपद बहाल करण्यात आल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.


‘फडणवीस गृहमंत्री झाले की राज्यात क्राईम रेट वाढतो’, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

राजस्थानमध्ये भाजप सरकार स्थापन होऊन 27 दिवस झाले. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. 12 आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. प्रथम सवाई माधोपूरचे आमदार किरोडीलाल मीणा यांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर गजेंद्र सिंह खिंवसर यांनी शपथ घेतली आहे. तर राज्यवर्धन सिंह राठोड यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आज 22 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. बारा जणांना कॅबिनेट आणि दहा जणांना राज्यमंत्री बनविण्यात आले आहे. काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात ंधी देण्यात आली आहे. अलवरमधून निवडून आलेले संजय शर्मा यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे.

Imran Khan यांना मोठा धक्का, आयोगाने निवडणूक लढवण्यास ठरवलं अपात्र

राजस्थानमध्ये भाजपने खासदारांनाही विधानसभेच्या मैदानात उतरविले होते. त्यात राज्यवर्धन सिंह राठोर हे जौतवारा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहे. राज्यवर्धन राठोड हे लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी प्रथम विधानसभेच्या रिंगणात उतरविले होते. पहिल्याच वेळेस ते आता राज्यात मंत्रीही झाले आहेत. तसेच काही अनुभवी आमदार मंत्री झाले आहेत. सहाव्यांदा आमदार झालेले किरोडीलाल मिना यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते दोन वेळा लोकसभेचे खासदार आणि एकदा राज्यसभा सदस्य राहिलेले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube