Download App

कोल्हापूर हादरलं! डोळ्यात चटणी टाकली अन् गळ्यावर सपासप वार, हातकणंगलेमध्ये निर्घृण हत्याकांड

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील भादोले गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीला निर्घृणपणे संपवलं आहे.

  • Written By: Last Updated:

कोल्हापूरमध्येही एक भयानक गुन्हा घडल्याचं समोर आलं असून त्यामुळे अख्खं शहर हादरलंय. (Kolhapur) कोल्हापूरच्या हातकणंगले मधील भादोले येथे निर्घृण हत्याकांडामुळे कोल्हापूरवासीयांच्या मनात दहशत पसरली आहे. तेथे एका इसमाने आधी त्याच्या बेसावध पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली आणि त्यानंतर तिच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार करून नृशंसपणे तिचा जीव घेतला.

रोहिणी पाटील असं मृत महिलेचे तर प्रशांत पाटील असं खून करणाऱ्या, आरोपी पतीचे नाव आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे पत्नीला संपवल्यानंतर तो गावात गेला, आपण खून केल्याचे कबूल करत मुलींवर लक्ष ठेवा असं गावकऱ्यांना सांगून तो तिथून फरार झाला. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. फरार खुनी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.

लॉरेन्स बिश्नोई टोळीला धक्का, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय; दहशतवादी संघटना म्हणून घोषित

मिळालेल्या माहितीनुसार, हाकतकणंगले येथील भादोले-कोरेगाव रस्त्यावरती भादोलेच्या हद्दीत आरोपी प्रशांत याने त्याच्या पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली. त्यानंतर त्याने तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले. सोमवारी रात्री ( 29 सप्टेंबर) 8.30 च्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर पती प्रशांत फरार झाला. वडगाव पोलिसात रात्री उशीरा या गुन्ह्याची नोंद झाली. पोलिसांनी कसून शोध घेत रात्री त्याला बेड्या ठोकल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत व त्याची पत्नी, मुलींसह भादोले येथे रहायचा. मात्र रोहिणीच्या वडिलांना बरं नसल्याने गेल्या आठवड्याभरापासून ते दोघे रोहिणीच्या माहेरी ढवळी (जि. सांगली) येथे ये-जा करायचे. एक दिवशी प्रशांतने चटणी घेऊन ती पत्नी रोहिणीच्या डोळ्यात टाकली. ती बेसावध असतानाचा त्याने हातातील कोयत्याने तिच्या गळ्यावर तसेच चेहऱ्यावर सपासप वार केले. यामुळे गंभीर जखमी झालेली रोहिणी रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

follow us