Download App

Devendra Fadnavis : मी पुन्हा आलो, पण दोन पक्षांना फोडून…; फडणवीस स्पष्टचं बोलले

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांनी प्रचाराच्या प्रत्येक भाषणात ‘मी पुन्हा येईन’ असा नारा दिला होता. मात्र, राज्यात मविआचे सरकार आलं. त्यानंतर त्यांनी विधानसभेतही ‘पुन्हा येईन’चा नारा दिला. त्याची विरोधकांनी खिल्ली उडवली. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपसोबत (BJP) युती केली आणि फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान, आता पुन्हा येईनच्या नाऱ्यावर फडणवीसांनी भाष्य केलं.

ठाकरेंचे विश्वासू आमदार आमश्या पाडवी शिंदे गटात; CM शिंदेंच्या हजेरीत घेतला प्रवेश 

काँग्रेस न होती तो क्या होता? या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईतील फोर सीझन्स हॉटेलमध्ये झाले. यावेळी फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी मी पुन्हा येईलच्या घोषणेविषयी विचारले असता ते म्हणाले की, मी पुन्हा येईन या विधानावर नेहमीच प्रश्न केला जातो. मी पुन्हा येईन एवढंच वाक्य नव्हतं, मी पुन्हा येईन ही सिंगल लाईन कधीच नव्हती. त्यात मी कोणासाठी पुन्हा येईन, काय काम करने? हे सगळं होतं. पण, हे एक वाक्य खूप पसिध्द झालं. त्यावेळी जनतेने आम्हाला निवडून दिलं होतं. पण, स्वार्थापोटी उद्धवजींनी पाठीत खंजीर खुपसला. मात्र, आम्ही पुन्हा आलो, तेव्हा कौतूक झालं. नव्हतो आलो तेव्हाही टीका झाली. मला पुन्हा यायला अडीच वर्षे लागली, पण जेव्हा आलो तेव्हा दोन पक्ष फोडून आलो, असं फडणवीस म्हणाले.

लोकसभा रणशिंग! अहमदनगर दक्षिणचं ठरलं पण उत्तरेचं काय? 

यावेळी त्यांनी कॉंग्रेसवरही सडकून टीका केली. ते म्हणाल, काँग्रेस नसती तर भारताची कधीच फाळणी झाली नसती, भारतात, अनाचार, भ्रष्टाचार आणि दहशतवाद भारतात कधीच दिसला नसती, अशा शब्दात त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली.

पुढं बोलतांना फडणवीस म्हणाले की, आता 400 पार करण्याच्या घोषणेमागील पंतप्रधानांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. आमचाही विश्वास आहे की आम्ही तिसऱ्यांदा निवडून येऊ, पण सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी, असा विश्वासही फडणवीसांना व्यक्त केला.

गुंडांशिवायही राजकारण करता येत हे मोदींनी दाखवलं
सत्तेतून पैसा, पैशातून ताकत आणि त्यातून सत्ता असे राजकारण आतापर्यंत सुरू होतं. सुरुवातीच्या काळातील राजकारण पाहिलं तर देशाचे राजकारण ३० कुटुंबांभोवती फिरत होते. मात्र 2014 नंतर पंतप्रधानांनी देशाचे आणि महाराष्ट्राचे चित्र बदलले. ही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम पंतप्रधानांनी केलं. १०० टक्के यश मिळत नाही. मात्र काम सुरू आहे, असंही फडणवीस म्हणाले.

follow us